अजिंक्य रेडकर नवी मुंबई महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचा विजेता
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 25, 2026
- 30
नेरूळच्या निरंत पाटील याने पटकाविला नमुंमपा क्षेत्र श्री सन्मान
नवी मुंबई ः राज्यभरातील शरीरसौष्ठवपटूंमध्ये अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आणि नमुंमपा क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा विष्णुदास भावे नाटयगृहात अत्यंत जल्लोषात संपन्न झाल्या. राज्यभरातील विविध जिल्हयातून आलेल्या विविध वजनी गटाच्या 128 शरीरसौष्ठवपटूंमधून कोल्हापूरच्या अजिंक्य रेडकर यांनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करीत दीड लाख बक्षिस रक्कमेसह नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठवपटू 2025-26 किताबासह मानाचा नवी मुंबई महापौर श्री चषक स्विकारला. सोलापूरच्या पंचाक्षरी लोणार यांनी 50 हजार पारितोषिक रक्कमेसह राज्यस्तरीय उपविजेतेपद पटकाविले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री 2025-26 या नवी मुंबई महानगरपालिका स्तरीय स्पर्धेत सहभागी 71 स्पर्धकांमधून सर्वोत्कृष्ट शरीरसौष्ठवपटूचे नमुंमपा क्षेत्र श्री विजेतेपद 70 हजार पारितोषिक रक्कम व मानाच्या चषकासहीत नेरूळच्या निरंत पाटील यांनी पटकाविले. नेरूळच्या अक्षय पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री स्पर्धेचे उपविजेतेपद 38 हजार रक्कमेसह संपादन केले. राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत मोहम्मद जमाल, ठाणे यांनी मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर किताब तसेच स्वप्निल सकपाळ, रायगड यांनी बेस्ट पोझर किताब पटकाविला. या दोघानांही प्रत्येकी रु. 15 हजार रक्कमेची पारितोषिके प्रशस्तीपत्रासह प्रदान करण्यात आली. नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा 55, 60, 65, 70, 75, 80, 85 किलोपर्यंत व 85 किलोवरील अशा 8 वजनी गटांमध्ये आयोजीत करण्यात आली. तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा 50, 55, 60, 65, 70 किलोपर्यंत व 70 किलोवरील अशा 6 वजनी गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. या प्रत्येक वजनी गटातील अनुक्रमे 6 व 5 विजेत्यांना रोख पारितोषिकांसह प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. सायं. 5 वाजल्यापासून रात्री 12.15 वाजेपर्यंत विष्णुदास भावे नाटयगृहात शरीरसौष्ठवपटूंचा व त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आलेल्या क्रीडारसिकांचा जल्लोश होता.
एकूण 199 शरीरसौष्ठवपटूंच्या उत्साही सहभागातून यशस्वी झालेल्या या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा शुभारंभ नवी मुंबईच्या महापौर सुजाता सुरज पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. नुकत्याच महारपालिकेच्या निवडणुका झाल्याने सहा वर्ष कालावधीनंतर या स्पर्धा नवी मुंबई महापौर श्री या पूर्वीच्याच नावाने आयोजित करण्यात आल्या. याप्रसंगी बोलताना महापौर महोदयांनी व्यायामाचा आणि आरोग्याचा अत्यंत निकटचा संबंध असल्याने शहरातील युवकांनी व्यायामाकडे वळावे जेणेकरून आपोआप ते व्यसनापासून दूर जातील व शहर सुदृढ व निरोगी होईल असे मत व्यक्त केले. अशा शरीरसौष्ठव स्पर्धांमधून युवकांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्यामध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीने या स्पर्धेचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे त्या म्हणाल्या. यापुढील काळात अधिकाधिक स्पर्धक यामध्ये सहभागी होतील असा महानगरपालिकेचा प्रयत्न राहील असे त्यांनी सांगितले व राज्यभरातून आलेल्या शरीरसौष्ठवपटूंचे स्वागत केले. महापौर महोदयांच्या शुभहस्ते नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री पुरस्कार वितरण करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai