तुर्भे डम्पिंग ग्राउंडला भीषण आग
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 28, 2026
- 44
नवी मुंबई ः नवी मुंबईतील तुर्भे परिसरातील डंपिंग ग्राउंडला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. आगीचे स्वरूप इतके मोठे होते की, डंपिंग ग्राउंडवरील कचऱ्याचे अजस्त्र ढिग जळून खाक झाले असून संपूर्ण परिसरात दाट धुराचे लोट पसरले होते. 14 तास उलटून गेले तरी येथील आग धगधगत होती. या धुरामुळे लगतच्या वसाहतींमधील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.
आग लागल्याची वर्दी मिळताच नवी मुंबई अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेतली. आगीची तीव्रता पाहता वाशी, नेरुळ, कोपरखैराणे, ऐरोली, बेलापूर यासह एमआयडीसी विभागाच्या अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पथके घटनास्थळी दाखल झाले. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली आग धुमसत असल्याने ती विझवण्यासाठी जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. डंपिंग ग्राउंडला वारंवार लागणाऱ्या आगींमुळे तुर्भे आणि वाशी परिसरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये,’ असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai