माइंडस्पेस इकोरन 2.0 मॅरेथॉन उत्साहात
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 09, 2026
- 33
फिटनेस आणि शाश्वततेचा संदेश देत 4000 जणांची धाव
नवी मुंबई ः माइंडस्पेस ऐरोली ईस्ट, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या माइंडस्पेस इकोरन 2.0 मध्ये 4000 हून अधिक महिला-पुरुष धावपटूंनी सहभाग घेतला. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे आयोजन माइंडस्पेस आरईआयटी यांनी मिर्चीच्या सहकार्याने केले होते. शहरात धावण्याची प्रेरणा आणि शाश्वततेचा ठाम संदेश या दोन्हींचे सुंदर मिश्रण या कार्यक्रमात पाहायला मिळाले. अनुभवी धावपटू, प्रथमच धावणारे, कुटुंबे तसेच कॉर्पोरेट टीम्स अशा विविध स्तरांतील महिलांनी यात सहभाग घेतला.
नवी मुंबईत रविवारी सकाळी उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेची लाट अनुभवायला मिळाली. कार्यक्रमाचा उत्साह अधिक वाढवण्यासाठी मिर्चीच्या प्रेरणा आरजे ने या रनचे सूत्रसंचालन केले. यावेळी अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते आणि त्यांनी धावण्याच्या स्पर्धेला फ्लॅग-ऑफ केले. ङ्गॠळपपू थशवीी र्डीपपू 2ङ्घ या चित्रपटातील कलाकार अविनाश तिवारी आणि मेधा शंकर उपस्थित होते. अभिनेत्री डेजी शाह सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाली आणि फिटनेस व शाश्वततेच्या या उत्सवाचा भाग बनली.
धावपटूंनी 5 किमी, 10 किमी आणि 21 किमी या श्रेणींमध्ये सहभाग घेतला. 21 किमी हाफ मॅरेथॉन आणि 10 किमी या श्रेणींमध्ये 18 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या सहभागींचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला, तर 5 किमी रनमध्ये 8 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना सहभागाची संधी देण्यात आली. त्यामुळे हा कार्यक्रम सर्व वयोगटांसाठी फिटनेस आणि सामुदायिक भावनेचा समावेशक उत्सव ठरला आणि मुंबईतील कार्यस्थळे व स्थानिक परिसरातून मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळाला. या स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली होती. 21 किमी हाफ मॅरेथॉनसाठी रु.20,000, रु. 14,000 आणि रु. 10,000 अशी पारितोषिके देण्यात आली, तर 10 किमी श्रेणीसाठी रु. 14,000, रु. 12,000 आणि रु.8,000 अशी पारितोषिके देण्यात आली. पर्यावरणपूरक अनुभव देण्याच्या उद्देशाने माइंडस्पेस इकोरन 2.0 मध्ये अनेक इको-फ्रेंडली उपक्रम राबवण्यात आले. यात प्लांटेबल बिब्स, ऑर्गॅनिक जर्सी, रीफिलेबल हायड्रेशन स्टेशन्स आणि नाश्त्यासाठी बायोडिग्रेडेबल कटलरी यांचा समावेश होता. या उपक्रमांचा उद्देश कार्यक्रमादरम्यान सिंगल-यूज वस्तूंचा वापर कमी करणे आणि जबाबदार कचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे हा होता.
उपक्रमाच्या दुसऱ्या पार्वाविषयी बोलताना माइंडस्पेस आरईआयटी चे सीईओ आणि एमडी रमेश नायर म्हणाले, माइंडस्पेस इकोरन हा आमच्या या विश्वासाचा प्रत्यय आहे की काम करण्याचे ऑफिसेस केवळ काम आणि बिझनेस या साठीच नव्हे तर समाज आणि पर्यावरणासाठी सकारात्मक बदल घडवून आणण्याचे प्रभावी माध्यम ठरू शकतात. ऐरोली ईस्ट येथे 4000 हून अधिक धावपटू फिटनेस आणि शाश्वततेच्या सामायिक उद्दिष्टाने एकत्र येताना पाहणे खरोखर प्रेरणादायी आहे. माइंडस्पेस इकोरन मुंबईमध्ये सजग जीवनशैली, सामुदायिक आरोग्य आणि शाश्वततेवर आधारित उपक्रमांना अधिक महत्त्व दिले आहे. यावर्षीची एक विशेष बाब म्हणजे कार्यक्रमातून गोळा झालेला कचरा अपसायकल करून त्यापासून उपयुक्त खुर्च्या तयार करण्यात येतील आणि त्या भागीदार स्वयंसेवी संस्थांमार्फत शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येतील.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai