शहरात पोलीसांचे कोम्बिंग ऑपरेशन
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 13, 2026
- 17
गुन्हेगारांची धाबे दणाणले ; 14 जणांवर गुन्हे
नवी मुंबई ः गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी एकाच वेळी धाड टाकुन पोलीस कोम्बिंग ऑपरेशन राबवत आहेत. यामध्ये शुक्रवारी एपीएमसी पोलीसांनी तर सोमवारी रबाळे पोलीसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. अचानक पोलीस धडकल्याने अवैध धंदे करणाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. या उपक्रमादरम्यान 14 जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यात एक फरार आरोपीही पोलिसांच्या हाती लागला आहे. एपीएमसी पोलिसांनी अमली पदार्थ विक्री प्रकरणी 1 नायझेरियन अटक करण्यात आला तर तीन संशयित बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु आहे.
शहरात वाढती गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व नशा मुक्त नवी मुंबईसाठी पोलीसांकडून विविध उपक्रम राबवले जातात. एपीएमसी पाठोपाठ रबाळे पोलिसांनी सोमवारी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या ऑपरेशन पूर्वीच पोलिसांनी संशयित ठिकाणांची पाहणी करून ठेवली होती. त्यानुसार हे कोम्बिंग ऑपरेशन नोसिल नाका, अर्जुनवाडी, घणसोली साईनाथ वाडी व रबाळे परिसरात राबविण्यात आले. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे (परिमंडळ-1) यांच्या मार्गदर्शनाखाली रबाळे पोलीस स्टेशन हद्दीत विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. मोहिमेत परिमंडळ 1 मधील 7 पोलीस स्टेशनमधील 4 पोलीस निरीक्षक, 16 सहाय्यक पोलीस निरीक्षक व 184 पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला. नशा मुक्त नवी मुंबई धोरणानुसार अमली पदार्थ विक्री व सेवन करणारे गुन्हेगार, अवैध दारू विक्री, गुटखा विक्री, जुगार क्लब अशा अवैध धंद्यांवर एकाच वेळी धाड टाकून करून कठोर कारवाई करण्यात आली.
यावेळी अवैध बांगलादेशी व नायजेरियन नागरिकांची तपासणी, फरारी व पाहिजे आरोपींचा शोध, हॉटेल व लॉजेस मधील संशयास्पद व्यक्तींची तपासणी, नाकाबंदी करून वाहन तपासणी तसेच वॉरंट बजावणी अशा विविध कारवाया करण्यात आल्या. एक आरोपी कडून एक देशी कट्टा व 2 राऊंड जप्त करण्यात आले तसेच त्यांचेकडून ब्राउन शुगर च्या 100 चिट्ठ्या मिळून आल्या त्याच्यावर आर्म ऍक्ट व अमली पदार्थ विरोधी कायदा अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान एकूण 14 आरोपींविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अवैध धंद्यांविरोधातील झिरो टॉलरन्स धोरणानुसार पुढील काळात अशा प्रकारच्या कॉम्बिंग मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण पाटील यांनी दिली.
कारवाईचा तपशील
- दारुबंदी कायदा मोडणाऱ्या 65 कारवाई एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल
- अमली पदार्थ विक्री 5 गुन्हे दाखल,
- अंमली पदार्थ सेवन 1 गुन्हा दाखल
- गुन्हेगार तपासणी 22
- वाहने तपासली 229
- वाहनांवर कारवाई 92
- पाहिजे / फरारी आरोपी तपासले 12
- पाहिजे आरोपी मिळून आले 1
- हॉटेल / लॉजेस तपासणी 11
- रहदारीस अडथळा होईल व जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अशा 4 फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल
- अवैध गुटखा विक्री केसेस 2 (आरोपी 2)
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai