पालिकेच्या अर्थसंकल्पाकडे नजर
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 13, 2026
- 29
नवी मुंबई ः पालिका प्रशासनाने महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतर्गत प्रारुप अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले आहे. या अंदाजपत्रकावर 16 मार्च रोजी चर्चा ठेवण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची दरवाढ नसलेला हा अर्थसंकल्प नवी मुंबईकरांसाठी कोणत्या सेवा व सुविधा प्रस्तावित करतो याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
देशातील श्रीमंत महापालिका म्हणून नवी मुंबई महापालिकेची ओळख आहे. या महापालिकेचे वार्षिक बजेट हे सूमारे 4500 कोटींचे असून 3000 हून अधिक कोटींच्या ठेवी असल्याने या महापालिकेवर सत्ता असावी असे सर्वच राजकीय पक्षांचे स्वप्न आहे. महापालिका स्थापनेपासून यावर वनमंत्री गणेश नाईक यांची एकहाती सत्ता असून गेली 25 वर्षे कोणत्याही प्रकारचा कर न वाढवता महापालिकेने केलेली प्रगती डोळ्यात भरण्यासारखी आहे.
देशातील अनेक प्रकल्पांची सुरुवात नवी मुंबई शहरातून झाली आहे. त्यामध्ये सीबीआर तंत्रज्ञानावर आधारित मलनिस्सारण प्रकल्प राबवणे , शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन करणे तसेच नागरिकांना 24 तास पाणीपुरवठा देणे या क्षेत्रात अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. गेली 5 वर्षे महापालिकेवर प्रशासकीय सत्ता असल्याने पाच वर्षाचे अर्थसंकल्प हे आयुक्त्यांच्या सल्ल्यावरुन बनवण्यात येत होते. दरम्यान, यावेळी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात जनप्रतिनिधींचा सहभाग होणार असल्याने नवी मुंबईकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दर्जेदार आरोग्य सेवा व सार्वजनिक वाहतुक तसेच पार्किंगचे नियोजन यात पालिकेने ठोस योजना आखावी आणि त्याचे नियोजन अर्थसंकल्पात दिसावे अशी अपेक्षा नवी मुंबईकरांना आहे. त्यामुळे सोमवारी स्थायी समितीत सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाबाबत नवी मुंबईकरांची उत्सुकता वाढली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai