खारघरमध्ये होणार रक्त कर्करोगाच्या उपचारांसाठी रुग्णालय
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 13, 2026
- 22
नवी मुंबई ः खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटरच्या ‘ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर’ (एक्ट्रेक) परिसरात रक्त कर्करोगाच्या उपचारांसाठी देशातील सर्वात मोठे अत्याधुनिक रुग्णालय उभारले जात आहे. सुमारे 370 खाटांची क्षमता असलेले हे रुग्णालय जून 2027 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
देशात दरवर्षी सुमारे 70 हजार ते 1 लाख नवे रक्त कर्करोगाचे रुग्ण आढळतात. तसेच एकूण कर्करोगाच्या रुग्णांपैकी सुमारे 8 ते 10 टक्के रुग्ण रक्त कर्करोगाने ग्रस्त असतात. या रुग्णालयामुळे रक्त कर्करोगाच्या उपचारांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. एक्ट्रेकच्या क्लिनिकल रिसर्च सेंटरचे उपनिदेशक डॉ. नवीन खत्री यांनी सांगितले की, या नव्या केंद्रामुळे संस्थेची उपचार क्षमता अनेक पटींनी वाढेल. टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी यांसारख्या आधुनिक उपचार पद्धतींमुळे रुग्णांच्या उपचार परिणामांमध्ये सुधारणा झाली आहे. मात्र, लहान शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात विशेष कर्करोग उपचार केंद्रांची कमतरता, तसेच बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आणि आजाराचे उशिरा निदान यामुळे अनेक रुग्णांच्या जगण्याच्या दरावर परिणाम होत आहे. तज्ज्ञांच्या मते, रक्त कर्करोग हा बालकांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. बालकांमधील एकूण कर्करोग प्रकरणांपैकी सुमारे 30 टक्के प्रकरणे रक्त कर्करोगाशी संबंधित असतात. भारतात दरवर्षी 30 हजारांहून अधिक बालकांमध्ये या आजाराचे निदान होते, तर सध्या सुमारे 90 हजार बालक या आजारासह जीवन जगत आहेत.
14 मजल्यांवर विविध सुविधाहे रुग्णालय 14 मजली असणार असून, ते पूर्णपणे रक्त कर्करोगाने ग्रस्त असलेल्या बालक आणि प्रौढ रुग्णांच्या उपचारांसाठी समर्पित असेल. या रुग्णालयात सुमारे 370 खाटा उपलब्ध असतील. त्यापैकी 20 विशेष खाटा बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय अत्याधुनिक निदान सुविधा, संशोधन प्रयोगशाळा आणि विविध वैद्यकीय संशोधनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai