महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 10, 2026
- 21
उरण : महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत शीलक्ष्मी सोशल फाउंडेशन यांच्या वतीने उरण येथे महिलांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम महिला सक्षमीकरण प्रकल्पांतर्गत राबविण्यात आला असून, महिलांना स्वावलंबी बनविणे आणि त्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देणे हा यामागील मुख्य उद्देश होता.
या शिबिरामध्ये ब्युटी पार्लर संबंधित प्रात्यक्षिक मार्गदर्शन देण्यात आले. यामध्ये विविध ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर, मेकअपचे मूलभूत तंत्र, तसेच हेअर स्टायलिंग याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. याशिवाय, या क्षेत्रात भविष्यातील संधी आणि कमी खर्चात व्यवसाय कसा सुरू करता येईल याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. ‘लर्न ॲण्ड अर्ण’ या संकल्पनेद्वारे महिलांना शिकतानाच उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. अनेक महिलांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत स्वतःच्या पायावर उभे राहण्याची आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची तयारी दर्शवली. त्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली, ज्यामुळे महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणाऱ्या शासकीय मदतीची जाणीव झाली.
शीलक्ष्मी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा रजनी ताजने यांनी श्री समर्थ कपा सखी यंसहाय्यता संस्था उरण त्यांच्या अध्यक्षां संगीता ढेरे यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच, अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करून महिलांसाठी नवीन संधी निर्माण केल्याबद्दल त्यांचेही कौतुक करण्यात आले. शिबिरातील महिलांनी भविष्यातही असे उपक्रम आयोजित करण्याची विनंती केली. हा उपक्रम महिलांमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि उद्योजकतेची प्रेरणा निर्माण करणारा ठरला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai