झोपडपट्टीवासियांच्या भल्यासाठी स्थानिक राजकर्त्यांचा जागर
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 17, 2026
- 30
क्लस्टर, एसआरए यांसह खाजगी विकासकांनाही प्राधान्य
नवी मुंबई ः एमआयडीसीने त्यांच्या जमिनीवर प्रस्तापित झोपडपट्टींचा विकास करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु केल्यानंतर नवी मुंबईतील सर्व राजकर्ते खडबडून जागे झाले असून आपणच झोपडपट्टीधारकांचे तारणहार असल्याचा आव आणत आहेत. मंत्री गणेश नाईक यांनी एमआयडीसीच्या निविदा प्रक्रियेला विरोध दर्शवला असून शिवसेनेच्या चौगुले यांनी क्लस्टर योजनेमार्फत विकासाचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे झोपडपट्टीवासियांच्या भल्यासाठी राजकर्त्यांनी सुरु केलेल्या जागरामागे अर्थकारण दडले असल्याचे बोलले जात आहे.
गेली अनेकवर्ष नवी मुंबईत लाखो नागरिक 47 हजाराहून अधिक झोपडपट्यांमध्ये वास्तव्य करत असून त्यांनी वारंवार मागणी करुनही त्यांचा विकास व्हावा म्हणून कोणत्याही पक्षाने ठोस भुमिका घेतल्याचे ऐकिवात नाही. शहरातील धोकादायक व मोडकळीस आलेल्या घरांचे पुनर्विकास व्हावे तसेच प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरे नियमीत व्हावी म्हणून नवी मुंबईकर स्थानिक नेत्यांकडे आशेने पाहत होते. 2020 साली पुनर्विकासाचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गी लावल्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्याही गरजेपोटी घरांचा प्रश्न मार्गी लावावा म्हणून स्थानिक पुढारी सक्रिय आहेत. परंतु, अनेकवर्ष झोपडपट्टीत राहणाऱ्या नवी मुंबईतील मतदारांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष झाल्याची खंत झोपडपट्टीवासियांची आहे.
नवी मुंबईतील झोपडपट्टीचा सर्वे 2005 साली महापालिकेने केला असून त्यांना स्थानिक नेत्यांच्या आडमुठे धोरणांमुळे ओळखपत्रे देण्यात आली नसल्याचे बोलले जाते. विधानसभा निवडणुकीपुर्वी विजय चौगुले यांनी पत्रकार परिषद घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत नवी मुंबईतील झोपडपट्टींचा विकास करणार असल्याचे जाहीर करुन त्यांचे सर्वेक्षणही सुरु केले होते. परंतु, स्थानिक राजकर्त्यांच्या हस्तक्षेपामुळे सदर सर्वेक्षण थांबवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. नुकतीच एमआयडीसीने त्यांच्या जमिनीवर असलेल्या झोपडपट्टीवासियाचे खाजगी विकासकामार्फत पुनर्वसन करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. त्यास मंत्री गणेश नाईक यांनी विरोध दर्शवला असून त्या बदल्यात ते कोणती योजना राबवणार आहेत हे त्यांनी जनतेपुढे न मांडल्याने झोपडपट्टीवासियांत नाराजी परसली आहे. नुकतीच विजय चौगुले यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन क्लस्टर योजनेमार्फत करावे अशी मागणी केल्याने पुन्हा एकदा झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- झोपडपट्टीवासियांचे भले करुन त्यांचा मसिहा ठरण्याच्या नादात स्थानिक नेते झोपडपट्टीवासियांचे नुकसान करत असल्याची चर्चा सध्या स्थानिकांमध्ये आहे. संबंधित नेत्यांनी झोपडपट्टीवासियांच्या भले करण्याचा सुरु केलेला जागर यामागे मोठे अर्थकारण दडले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नेमके कोणत्या योजनेतून झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होणार आहे याबाबत सर्वच अनभिज्ञ असल्याने झोपडपट्टीधारकांमध्ये संभ्रम पसरला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai