अतिधोकादायक इमारतींवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- May 26, 2026
- 26
नवी मुंबई ः महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सी विभाग वाशी कार्यक्षेत्रातील सी-1 म्हणजे अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्काशीत करणे या प्रवर्गात घोषित करण्यात आलेल्या इमारतींवर पालिकेने कारवाई केली आहे.
पालिकेने 542 इमारती धोकादायक घोषित केल्या आहेत. त्यातील 52 इमारती अतिधोकादायक आहेत. या इमारतीमधील रहिवास वापर तात्काळ थांबवण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. या धोकादायक इमारतींचा वापर थांबावा म्हणून पालिकेने इमारतींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहेत. तेथील वीज व पाणी खंडित करण्यात येत आहे. आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आदेशान्वये व उपायुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सी विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुखदेव येडवे यांच्या नियंत्रणाखाली काही इमारतींचा पाणी पुरवठा व विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यामध्ये जय महाराष्ट्र, जे एन-2 टाईप अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन, भु.क्र.4 से.9 वाशी, (बिल्डींग नं.31 ते 46) 16 इमारती, लिटिल फ्लॉवर को. ऑप. हौ.सो. लि जेएन-4 टाईप (बिल्डिंग नं. 9) से.9 वाशी, मे. नुर को ऑप हौ सो लि, प्लॉट नं -18, सेक्टर-09 ए, वाशी, डी टाइप अपार्टमेंट ओनर्स असो. इमारत क्र. डी-1, ते इमारत क्र. डी-4, से.1, वाशी यांचा समावेश आहे. या धडक मोहिमेसाठी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी/कर्मचारी, विद्युत पुरवठा विभागाचे अधिकारी/कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे अधिकारी/कर्मचारी, अतिक्रमण पोलीस व स्थानिक पोलिस स्टेशनचे कर्मचारी उपस्थति होते. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai