अनधिकृत बांधकामावर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- May 26, 2026
- 26
नवी मुंबई ः महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात अतिक्रमण विभागाने ऐरोली व घणसोली विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली कार्यालया अंतर्गत घर क्र- 166, ऐरोली गाव येथे हितेश किशोर कोटकर यांनी बांधकाम परवानगी व्यतिरिक्त अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते. कोटकर, घर क्र- 166, यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांस जी विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये दि. 16.04.2026 रोजी नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटविने आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. सदरचे अनधिकृत बांधकाम साधना पाटील, सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी ऐरोली, यांचे नियंत्रणाखाली तोडक मोहिमेचे आयोजन करुन सदर अनधिकृत बांधकाम अंशत: निष्कासित करण्यात आले.
तसेच विभाग कार्यालय घणसोली एकनाथ शांताराम पाटील, (घरमालक), स्व. चांगोशेठचौक, साळवीनगर, गोठवली, घणसोली यांनी अनधिकृत बांधकाम नवी मुंबई महापालिकेची कोणतीही पुर्वपरवानगी न घेता सुरू केले होते. सदरील अनधिकृत बांधकामांस घणसोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते. सदर अनधिकृत बांधकामावर नवी मुंबई महानगरपालिकेकडून तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai