थ्री आर सेंटर्स स्वच्छतेसोबतच शाळांमध्ये जनजागृती
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 24, 2026
- 23
नवी मुंबई ः स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 मध्ये स्वच्छता मोहीमा व जनजागृतीवर भर देण्यात येत असून 15 जूनपासून 30 जूनपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे व त्यामध्ये लोकसहभागावर भर देण्यात येत आहे. परिमंडळ 1 क्षेत्रात न.मुं.म.पा शाळा, सेक्टर 5, सानपाडा गाव याठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती तर परिमंडळ 2 क्षेत्रात थ्री आर सेंटरची विशेष स्वच्छता मोहीम करण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणानुसार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या माध्यमातून विशेष स्वच्छता मोहीमा राबविण्यात येत आहेत. परिमंडळ 1 क्षेत्रात न.मुं.म.पा शाळा, सेक्टर 5, सानपाडा गाव याठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली. यात शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, स्वच्छता दूत, सर्व स्वच्छता निरीक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी घरातूनच 4 प्रकारे कचरा वर्गीकरण करण्याचे महत्व पटवून देत त्याविषयी आपल्या घरापासूनच सुरूवात करावी असे सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्याचप्रमाणे, परिमंडळ 2 क्षेत्रात थ्री आर सेंटरची विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नको असेल ते द्या आणि हवे असेल ते घ्या या संकल्पनेवर आधारित ही थ्री आर सेंटर बहुउपयोगी आहेत. आपल्या घरातील नको असलेले सुस्थितीतील कपडे, भांडी, पुस्तके असे उपयोगी साहित्य, वस्तू या थ्री आर सेंटरमध्ये आणून ठेवल्यास ज्यांना त्याची गरज आहे असे नागरिक या ठिकाणाहून ते साहित्य. वस्तू घेऊन जाऊ शकतात अशी ही संकल्पना असून कचऱ्यात टाकल्या जाणाऱ्या साहित्याला पुनर्वापरात आणून नवजीवन देणारा हा अभिनव उपक्रम आहे. या थ्री आर सेंटर मध्ये विशिष्ट प्रकारचे साहित्य ठेवण्यासाठी कप्पे आहेत. मात्र काही नागरिक वस्तू पाहून झाल्यानंतर योग्य कप्प्यात ठेवत नाहीत. त्यामुळे त्याठिकाणी अस्वच्छता वाढीस लागते. याकडे प्राधान्याने लक्ष देत ‘विशेष स्वच्छता मोहीमा’ राबविण्यात आल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai