एकल महिला दिनानिमित्त विविध उपक्रम
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 24, 2026
- 24
नवीमुंबई ः संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केल्यानुसार दि. 23 जून या आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या बालविकास विभागाच्या वतीने सूचित करण्यात आल्यानुसार नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महापौर सुजाता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आठ ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकल महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत हे कार्यक्रम यशस्वी केले.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या दोनशेव्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे केंद्र शासन, राज्य शासन व महानगरपालिका यांच्यामार्फत एकल महिलांसाठी रोजगार, स्वयंरोजगार व उपजिविका याकरीता राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती त्यांना देण्यात आली. याशिवाय बचत गटाच्या माध्यमातून विकास होण्याच्या दृष्टीने बचत गटाचे महत्व विशद करुन बचत गट स्थापन करण्याबाबतची प्रक्रिया व माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे एकल महिलांना जाणवणाऱ्या समस्या व त्याबाबतच्या सूचना आणि आक्षेप जाणून घेण्यात आले. महिलांशी संवाद साधून जास्तीत जास्त महिलांनी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. 8 ठिकाणी आयोजित या उपक्रमामध्ये एकल महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. समाजविकास अधिकारी तसेच समाजसेवक व समुह संघटकांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्वाची भूमिका बजावली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai