कोव्हीड उपचारासाठी खाजगी रुग्णालयात लूटमार
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 10, 2020
- 674
बिलांच्या तक्रार निवारणासाठी पालिकेचे विशेष केंद्र
नवी मुंबई ः कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र काही खाजगी रुग्णालयांमघ्ये शासनाने जाहीर केलेल्या दरांपेक्षा जास्त दर आकारला जात आहे. रूग्णांकडून आकारण्यात आलेल्या बिलांच्या तक्रारी संदर्भातील मदतीसाठी कोव्हीड 19 बिल तक्रार निवारण केंद्र कार्यान्वित करण्यात येत आहे.
नवी मुंबई महाीनगरपालिकेकडून कोरोना बाधितांना त्यांच्या लक्षणांनुसार योग्य प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामध्ये बेड्स उपलब्धतेबाबत अडचणी येऊ नयेत याकरिता रिअल टाईम अपडेटेड डॅशबोर्ड ुुु.पाालहशरश्रींहषरलळश्रळींळशी.लेा कार्यान्वित करण्यात आलेला आहे.त्याचप्रमाणे, काही खाजगी रूग्णालये शासनाने जाहीर केलेल्या दरांपेक्षा जास्त दर आकारात असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून प्राप्त होत असल्याने नागरिकांना सुलभपणे विनासायास आपली तक्रार नोंदविता यावी व त्यावर विहित वेळेत योग्य कार्यवाही व्हावी याकडे आयुक्त अभिजीत बांगर यांनी विशेष लक्ष दिले आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी कोव्हीड रूग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांकडून आकारण्यात आलेल्या बिलांच्या तक्रारी संदर्भातील मदतीसाठी कोव्हीड 19 बिल तक्रार निवारण केंद्र (र्उेींळव इळश्रश्र उेाश्रिरळपीं उशपीींश) कार्यान्वित करण्यात येत आहे. याकरिता 022-27567389 हा दूरध्वनी क्रमांक तसेच 7208490010 हा व्हॉट्स प क्रमांक नागरिकांच्या सुलभ संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
महानगरपालिकेस प्राप्त होत असलेल्या तक्रारींचे निराकरण तत्परतेने करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीत तळमजल्यावर दि. 7 सप्टेंबर 2020 पासून सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत ’कोव्हीड बिल तक्रार निवारण केंद्र (र्उेींळव इळश्रश्र उेाश्रिरळपीं उशपींशी)’ सुरू करण्यात येत आहे. या विशेष केंद्राकरिता 022-27567389 या हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात येत असून कोव्हीड रूग्ण अथवा त्यांचे नातेवाईक कोव्हीड बिलांविषयीच्या तक्रारीसाठी त्यावर संपर्क साधू शकतील. बिलांविषयी प्राप्त झालेल्या तक्रारींवर महानगरपालिकेच्या वतीने 24 तासांत योग्य ती कार्यवाही केली जाईल व सदर कक्षाकडून तक्रारदाराला तक्रारीविषयी करण्यात आलेल्या कार्यवाहीविषयी माहिती देण्यात येईल. याशिवाय तक्रारदार आपल्या टोकन क्रमांकाचा संदर्भ देऊन आपल्या तक्रारीविषयी करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती या केंद्राकडून उपलब्ध करून घेऊ शकेल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai