ऐरोली स्थानकात लोकल थांबण्यास सुरुवात
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 14, 2020
- 698
मनसेच्या आंदोलनाला यश
नवी मुंबई ः ठाणे ते पनवेल धावणार्या लोकल सेवा सुरू आहेत. परंतु, या लोकल ट्रेन ऐरोली रेल्वे स्टेशनवर थांबत नव्हत्या. या संदर्भात नवी मुंबई उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली स्थानकात धरणे आंदोलन करून रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मनसेच्या या आंदोलनाला यश आले असून, ऐरोली स्थानकात आज 10 ऑक्टोबर पासून लोकल थांबण्यास सुरवात झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या कित्येक महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेन बंद आहेत. अनलॉक जाहीर केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक ऑफिसमध्ये जात आहेत. लोकल ट्रेन सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनवाहिनी आहे. ट्रेन बंद असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मनसेच्या माध्यमातून सविनय कायदेभंग आंदोलन पुकारत लोकलमधून प्रवास करत रेल्वे प्रशासनाचा निषेध केला होता. नवी मुंबई मनसेचे मनसैनिक रस्त्यावर उतरले होते व त्यांनी धरणे आंदोलन करून रेल्वेच्या सर्व लोकल ट्रेन ऐरोली रेल्वे स्थानकावर थांबल्या पाहिजे. या विषयावर निवेदन देण्यात आले होते. पुढील 15 दिवसात रेल्वे ऐरोली स्थानकावर थांबल्या नाही तर, रेल रोको आंदोलनाचा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला होता. त्यानंतर 10 ऑक्टोबर पासून ठाणे ते पनवेल धावणार्या रेल्वे ऐरोली स्टेशनवर थांबण्यास सुरवात झाली. यावेळी निलेश बाणखेले यांनी रेल्वे चालकाचा सत्कार करत रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai