स्थायी समिती सभापतीपदी संतोष शेट्टी बिनविरोध
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 29, 2020
- 623
पनवेेल : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजप नगरसेवक संतोष शेट्टी तर महिला व बालकल्याण सभापतीपदी मोनिका महानवर यांची बिनविरोध निवड झाली आहे. याशिवाय प्रभाग समिती ‘अ’ सभापतीपदी अनिता पाटील, प्रभाग समिती ‘ब’ सभापतीपदी समीर ठाकूर, प्रभाग समिती ‘क’ सभापतीपदी हेमलता म्हात्रे आणि प्रभाग समिती ‘ड’ सभापतीपदी सुशील घरत यांची निवड झाली आहे.
माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेत भाजप-आरपीआयची एक हाती सत्ता असल्याने या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित होता फक्त त्याची औपचारिकता शिल्लक होती. त्यानुसार बुधवारी निकाल जाहीर होऊन पुन्हा एकदा स्थायी समिती सभापती, महिला व बाल कल्याण सभापती व प्रभाग समिती सभापतीपदी भाजप आरपीआयचे वर्चस्व स्पष्ट झाले.
पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रविण पाटील, महिला व बालकल्याण सभापती कुसूम म्हात्रे, प्रभाग समिती सभापती शत्रृघ्न काकडे, संजय भोपी, गोपीनाथ भगत आणि तेजस कांडपीळे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या. 26 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पदांची निवडणूक दि. 28 ऑक्टोबरला ऑनलाईन पद्धतीने झाली. स्थायी समिती सभापतीपदासाठी संतोष शेट्टी, आणि महिला व बाल कल्याण सभापतीसाठी मोनिका महानवर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. अ, ब, क, ड, या प्रभाग समितीसाठी अनुक्रमे अनिता पाटील, समीर ठाकूर, हेमलता म्हात्रे व सुशिला घरत यांनी अर्ज दाखल केला होता. निकालानंतर पुन्हा एकदा स्थायी समिती सभापती, महिला व बाल कल्याण सभापती व प्रभाग समिती सभापतीपदी भाजप-आरपीआयचे वर्चस्व स्पष्ट झाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai