जड वाहनांना 10 टक्के टोल वाढ
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 20, 2020
- 914
मुंबई : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असलेल्या नाक्यांवर पथकरात जड वाहनांवर 10 टक्के टोल वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 15 टोल नाक्यावर ही वाढ लागू होणार आहे. तसेच हलक्या वाहनांवरील सूट कायमच राहणार आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खासगीकरण प्रकल्पांवर केवळ जड वाहनांसाठी पथकर दरामध्ये काही प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कार, जीप, एसटी, स्कूल बसेस आणि हलकी वाहने यांची सूट कायम ठेवण्यात येणार आहे. पथकरात 10 टक्के वाढ करताना वाढीव दर हे राष्ट्रीय महामार्गावरील पथकरांच्या तुलनेत कमीच असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. सध्या बांधकाम विभागाच्या अखत्यारितील 15 प्रकल्पांतर्गत वाहनांना पथकरातून सूट दिली जाते. त्यामुळे शासनाला दरवर्षी सुमारे 350 ते 400 कोटी रुपयांची भरपाई कंत्राटदारास द्यावी लागते. ही नुकसान भरपाई रोखीने न देता जड वाहनांवरील पथकर काही प्रमाणात वाढविण्याचा तसेच पथकर वसुलीसाठी वाहनांचे प्रकारही वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भरपाईपोटी सरकारच्या तिजोरीवर येणारा भार कमी होणार आहे.
आतापर्यंत 1) कार, जीप, टाटा सुमो, कमांडर, ट्रॅक्स, वाहनचालक वगळून असलेली सहा आसनी प्रवासी रिक्षा व इतर तत्सम वाहने 2) मिनी बस किंवा तत्सम वाहने 3) दोन आसांचे ट्रक, बस 4) तीन आसांची अवजड वाहने, असे चार प्रकार होते. आता ट्रक-ट्रेलर, तीनपेक्षा अधिक आसांची वाहने हा पाचवा प्रकार नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai