महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन?
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 03, 2021
- 784
मुख्यमंत्र्यांचा सुचक इशारा ; राजकीय पक्षाला विनंती आहे, लोकांची जीव जाईल असं वागू नका
मुंबई ः राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी तब्बल 43 हजार कोरोना बाधितांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुर्ण लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
घाबरवण्यासाठी आलेलो नाही, मार्ग काढण्यासाठी आलो आहे, घाबरू नका असा धीर देत मुख्यमंत्री ठाकरे यांनी संवादाची सुरुवात केली. राज्यातील परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी मी संवाद साधत आहे. कोरोनाचा शिरकाव होऊन आता वर्ष पूर्ण झालं आहे. मधल्या काळात या विषाणूला रोखण्यास आपण यशस्वी झालो होतो. कोरोनामुळे जगाची आर्थिक परिस्थिती दोलायमान झाली आहे. लॉकडाऊन करण्याची शक्यता पूर्णपणे टळलेली नाही. राज्यात रुग्ण वाढ झपाट्यानं होतं असून एकट्या मुंबईत दररोज 8 हजारांहून अधिक रुग्ण वाढत आहे. आज राज्यात 46 हजारपर्यंत संख्या वाढत चाललेली आहे. बेड्स, व्हेटिंलेटर, ऑक्सिजन बेड्स जरी वाढवत असलो तरी लागणारे डॉक्टर, तज्ज्ञ, नर्सेस कसे वाढणार? हा प्रश्न टिकाकारांना विचारला. आज राज्यात दोन वरुन पाचशे चाचण्यांची सेंटर उभारुन 50 हजार चाचण्या दर दिवशी होत आहेत. महाराष्ट्रात 75 हजार चाचण्या करण्याची क्षमता 1 लाख 82 हजार एवढी झाली आहे. पण त्याहीपेक्षा अडीच लाख क्षमता करायची आहे. आतापर्यंत 50 लाख नागरिकांचे लसीकरण पुर्ण झाले आहे. केंद्राने सहकार्य केल्यास दिवसाला तीन लाख लसीकरणाचे लक्ष राज्याने ठेवले आहे. नागरिकांच्या हितासाठी मला कठोर निर्णय घ्यावे लागतील त्यासाठी मला विलन जरी ठरवलं तरी चालेल. कारण आपले कुंटुंब ही माझी जबाबदारी असल्याने त्यासाठी मी कोणतीही टिका सहन करण्यास तयार आहे असे ठाकरे यांनी सांगितले.
- अर्थचक्रही चालवायचं आहे जीवही वाचवायचा आहे. कोरोना विरूध्द लढाईसाठी पुन्हा सिध्द व्हा!
- स्वयं शिस्तीने संसर्गाची लाट रोखणे शक्य परंतु दोन दिवसांत योग्य तो निर्णय घेऊ
- येत्या दोन दिवसांत राज्यातील वाढणार्या रुग्णसंख्येचा आढावा घेऊन तसेच तज्ज्ञांशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेणार
राज्यातील आरोग्य सुविधा
एकुण वापरात
विलगीकरण बेड 2,20,000 1,37,000
आयसीयु बेड 20,519 9849
व्हेंटिलेटर बेड 9,347 2,336
ऑक्सिजन बेड 62,000 15,500
ऑक्सिजन बेड 62,000 15,500
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai