राज्यव्यापी 300 कोटी वृक्षलागवड अभियान
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 05, 2026
- 18
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विविध उपक्रमांचे उद्घाटन
मुंबई ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय कर्मचारी निवासस्थान संकुलाचे भूमिपूजन, पर्यावरण जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष प्रचार वाहनाचे उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यव्यापी 300 कोटी वृक्षलागवट अभियानाचा शुभारंभ वनमंत्री गणेश नाईक यांच्या करण्यात आला.
या कार्यक्रमात वन कर्मचाऱ्यांना जंगलात स्वसंरक्षणासाठी उपयुक्त असलेल्या किटचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले. यावेळी गृह स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा आमदार प्रवीण दरेकर, आमदार संजय उपाध्याय, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मनीषा चौधरी, प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश दरेकर, गणेश शंकर, सरिता झोरे, अंकिता सावे, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक (सीसीएफ) के. प्रदीपा, एन.आर. प्रवीण, वन विभागाच्या उपसचिव निकिता पांडे तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील उपस्थित होत्या. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानातून देशभरात वृक्षारोपणाची लोकचळवळ उभी राहिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील राज्यव्यापी 300 कोटी वृक्षलागवड अभियानातून महाराष्ट्र हरित आणि पर्यावरणदृष्ट्या अधिक सक्षम होईल, असा विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यप्राण्यांना जंगलातच खाद्य उपलब्ध व्हावे यासाठी जांभूळ, पेरू, फणस यांसारख्या फळझाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे वन्यप्राणी अन्नाच्या शोधात जंगलाबाहेर येण्याचे प्रमाण कमी होईल. डोंगरवस्त्या आणि पाड्यांपर्यंत रस्ते सुविधा पोहोचविण्यासोबतच देवराई आणि वनराई निर्माण करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai