दुषित पाण्याने विरोधकांना घशाचा आजार?
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 05, 2026
- 19
पाणी पिण्यायोग्य असल्याचा महापौरांचा दावा; विरोधकांच्या चुप्पीने नवी मुंबईकर नाराज
नवी मुंबई ः गेल्या अनेक दिवसांपासून नवी मुंबईत गढुळ व दुषित पाण्याची समस्या भेडसावत आहे. मात्र महापौर सुजाता पाटील यांनी मोरबे धरणातून येणारे पाणी हे शुध्दीकरण होऊन येत असल्याने ते स्वच्छ व पिण्यायोग्य असल्याची प्रतिक्रिया दिली. परंतु, महापौरांच्या प्रतिक्रियेनंतरही गढुळ पाणी येतच असल्याने नवी मुंबईतील एकाही विरोधी पक्षाने आवाज न उठवल्याने त्यांना दुषित पाण्याने घशाचा आजार झाला आहे का असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला आहे.
नवी मुंबईत गढुळ व दुषित पाणी येत असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नळाव्दारे पाणी गढुळ येत असल्याच्या तक्रारी आल्यावर महापौरांच्या निर्देशानुसार पाणीपुरवठा विभागाने विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेऊन तपासणी केली असता ते पिण्यायोग्य आढळले. महापौर, उपमहापौर यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत मोरबे धरण प्रकल्पाची व पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी करुन तेथील पाणी प्राशन करुन ते स्वच्छ आणि शुध्द असल्याचा निर्वाळा दिला.
महापौरांच्या भेटीनंतरही शहरात ठिकठिकाणी गढुळ पाण्याचा पुरवठा सुरुच असल्याने नवी मुंबईकरांनी संताप व्यक्त केला आहे. छोट्या मोठ्या प्रकरणांवर मोर्चा काढणारे विरोधी पक्षाचे नेते नवी मुंबईकरांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या या प्रश्नाबाबत कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गढुळ पाण्यामुळे विरोधकांना घशाचा आजार झाला का ? असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला आहे. त्यामुळे नगरसेवकांनी फक्त गटर, रस्ते व पदपथ या कामांकडेच लक्ष न देता नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत समस्यांकडे गांभिर्याने लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया ‘स्वान’ या सामाजिक संस्थेचे सचिव संतोष जाधव यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai