कोव्हिड लसीकरणाविषयीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 19, 2021
- 633
नवी मुंबई ः सध्या लसींच्या उपलब्धतेनुसार दररोज लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात येत असून दुसर्या दिवशी कोणत्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार आहे याची माहिती प्रत्येक केंद्रांवर उपलब्ध असणार्या लसींच्या डोस संख्येसह आदल्या दिवशी संध्याकाळी महानगरपालिकेच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या समाज माध्यमांव्दारे तसेच व्हॉट्स अपव्दारे व्यापक स्वरूपात प्रसिध्द करण्यात येत आहे. याशिवाय नागरिकांना लसीकरणाविषयीची माहिती अधिक सुलभपणे उपलब्ध व्हावी अशा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या हींींिी://ुुु.पाालर्लेींळवलरीश.लेा या विशेष पोर्टलवर कोव्हीड 19 लसीकरणाविषयी अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
आता नागरिक या वेबसाईटवरील कोव्हिड 19 तअउउखछअढखजछ या सेक्शनवर क्लिक करून महानगरपालिकच्या कोणत्या लसीकरण केंद्रांवर, कोणत्या लसीचे, किती डोस, कोणत्या वयोगटासाठी, कोणत्या वेळेत उपलब्ध आहेत अशी सर्व माहिती सहजपणे जाणून घेऊ शकतात व त्यानुसार आपल्या लसीकरणाचे नियोजन करू शकतात. विशेष म्हणजे नागरिकांनी निवडलेल्या लस उपलब्ध असलेल्या त्यांच्या नजिकच्या लसीकरण केंद्रांवर सहज पोहचता यावे याकरिता लसीकरण केंद्राचा पत्तादेखील या पोर्टलवर लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गुगल मॅपव्दारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. दररोज संध्याकाळी 7 वा. दुसर्या दिवशीच्या लसीकरण सत्राची माहिती या विशेष पोर्टलवर अद्ययावत करण्यात येणार असून नागरिक पोर्टलला भेट देऊन त्यानुसार आपल्या लसीकरणाचे सुलभपणे नियोजन करू शकतात. या पोर्टलवरून यापूर्वीच महानगरपालिकेच्या कोव्हीड टेस्टींग केंद्रांवर केलेल्या कोव्हीड टेस्ट्सचा रिपोर्ट कोव्हिड 19 तअउउखछअढखजछ सेक्शनमध्ये सहजपणे उपलब्ध होण्याची व्यवस्था केलेली असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. त्याच पोर्टलवर आता दररोजच्या लसीकरणाची संपूर्ण माहिती एका क्लिकव्दारे समजणार असल्याने नागरिकांना हे अत्यंत सुविधाजनक होणार आहे. नागरिक अगदी आपल्या हातातील मोबाईलवरूनही लसीकरणाविषयीची माहिती सहजपणे जाणून घेऊ शकतात.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai