परदेशी जाणार्यांसाठी विशेष लसीकरण
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 17, 2021
- 342
नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांपैकी शिक्षणाकरिता परदेशात जाणारे विद्यार्थी, कामासाठी परदेशात जाणार्या व्यक्ती तसेच अत्यंत तात्काळ कामासाठी परदेशात जाणार्या व्यक्ती यांना कोव्हीशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवस पूर्ण झाले असल्यास दुसरा डोस देण्यात येत आहे. याकरिता पालिका मुख्यालयात अॅम्फीथिएटर येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी 2 ते सायं. 5 या वेळेत आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशाप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांपैकी शिक्षणाकरिता परदेशात जाणारे विद्यार्थी, कामासाठी परदेशात जाणार्या व्यक्ती तसेच अत्यंत तात्काळ कामासाठी परदेशात जाणार्या व्यक्ती यांना कोव्हीशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवस पूर्ण झाले असल्यास दुसरा डोस देण्यात येत आहे. याकरिता नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अॅम्फीथिएटर येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी 2 ते सायं. 5 या वेळेत आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रांमध्ये सदर व्यक्ती नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात रहात असल्याचे आधारकार्ड, भाडेकरार, इलेक्ट्रीसिटी बिल, पासपोर्ट इत्यादी रहिवास पुरावा असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे परदेशात शिक्षणासाठी वा नोकरीसाठी निवड झाल्याची कागदपत्रे, अत्यावश्यक कारणासाठी जावयाची कागदपत्रे, पासपोर्ट, व्हिसा, पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रांचा समावेश आहे. या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती लाभार्थ्याने स्वाक्षांकित करावयाच्या आहेत. सदर कागदपत्रांची मुख्यालयात तपासणी करण्यात येत असून त्यावर कोव्हीड 19 लसीकरण मोहीमेसाठी नियुक्त नोडल अधिकारी यांनी कागदपत्रे योग्य असल्याचे प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर 15 नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय येथे लसीकरण करण्यात येत आहे. सप्टेंबर महिन्यात 63 लाभार्थ्यांनी या विशेष लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला असून 16 जूनपासून आत्तापर्यंत विविध महत्वाच्या कामांसाठी परदेशी जाणार्या एकूण 1718 नागरिकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेतला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai