मास्टरमाईंड राष्ट्रीय स्पर्धेत स्वरांश चमकला
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 20, 2021
- 700
सलग तिसर्यांदा पटकावले पदक
नवी मुंबई ः सन 2019-2020 मध्ये पार पडलेल्या ‘मास्टरमाईंड नॅशनल चॅम्पियनशिप’ स्पर्धेमध्ये बेलापुरच्या स्वरांश कोळी याने उत्कृष्ट कामगिरी करून तिसर्या क्रमांकाचे मानांकन पटकावले आहे. स्वरांशने सलग तिसर्यांदा आपले स्थान कायम राखले आहे.
स्वरांश कोळी याने प्रथम शालेय स्तरीय व त्यानंतर राज्यस्तरीय अशा दोन्ही परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून ‘मास्टरमाईंड नॅशनल चॅम्पियनशिप’ स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेसाठी विविध राज्यातून हजारो विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये स्वारांशने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला तीन गौरव चिन्ह, एक रौप्य पदक व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले.
बेलापुर येथे राहणारा 7 वर्षीय स्वरांश कोळी हा तेथीलच भारती विद्यापीठमध्ये शिक्षण घेत आहे. मास्टरमाईंड संस्था, भारती विद्यापीठ शैक्षणिक संस्थेतर्फे स्वरांशचे कौतुक करुन त्याला गौरव चिन्ह बहाल केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai