स्मरणिका प्रकाशन सोहळा उत्साहात
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 05, 2021
- 760
सिनीअर सिटीझन हेल्थकेअर फाऊंडेशनच्या वतीने लाईव्ह कार्यक्रम संपन्न
नवी मुंबई ः जागतिक ज्येेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ऐरोलीतील सिनीअर सिटीझन हेल्थकेअर फाऊंडेशन या संस्थेने 1 ऑक्टोबर रोजी संस्थेच्या स्मरणिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शरदजी डीचोलकर, अध्यक्ष फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभाग यांच्या अध्यक्षतेखाली व वसंतराव चव्हाण, चेअरमन इंद्रावती हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, ऐरोली यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लाईव्ह कार्यक्रम संपन्न झाला.
कुमार भार्गव पाटणकर याने केलेल्या शंखनादाच्या मधुर आवाजात मान्यवरांच्या हस्ते द्विप प्रज्वलित करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय करण्यात येऊन त्यांना संस्थेचे स्मृती चिन्ह व भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष बबनराव पाटणकर यांनी प्रास्तविक करून, संस्था स्थापन करण्यामागील उद्देश स्पष्ट केल्या नंतर वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते, प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत स्मरणिकेचे लाईव्ह प्रकाशन केले. या कार्यक्रमासाठी टी पी आर उन्नी, सेक्रेटरी जनरल अखील भारतीय वरीष्ठ नागरिक महासंघ, नारायण गावंड, अध्यक्ष, सहकार बाजार कळवा व सुरेश पोटे सचिव फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभाग यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
यावेळी संस्थेच्या 75 वर्ष पूर्ण केलेल्या सभासदांना योगा मॅट देऊन गौरविण्यात आले. यापुढेही त्यांनी दररोज योगा करून, आपले आरोग्य सुदृढ ठेवावे असा वेगळा संदेश याद्वारे देण्यात आला. सदर कार्यक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनwww.partlive.com या संकेतस्थळावरुन प्रक्षेपित करण्यासाठी प्रगती इन्स्टिट्यूट ऐरोलीचे संस्थापक बबनराव मगदूम यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी संस्थेच्या हितचिंतकांना तसेच स्मरणिका समिती प्रमुख भारत म्हात्रे व स्मरणिका संपादक शांताराम विशे यांना स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात अध्यक्ष शरद डिचोळकर यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करून मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव संजय जाधव, सहसचिव महादेव इंगळे, व सदस्य शिवराम भोसले, धनाजी भोसले, विश्वास मोहीते, किसनराव चित्ते यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माधवी देशमुख यांनी, तर आभार प्रदर्शन संजय जाधव यांनी केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai