स्वच्छतेबाबत नवी मुंबईचे इतरांनी अनुकरण करावे
- by Aajchi Navi Mumbai
- May 22, 2026
- 21
राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी यांचे मत
नवीमुंबई ः महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी नवी मुंबई महानगरपालिका येथे भेट देत सफाई कामगारांच्या विविध विषयांबाबत सविस्तर आढावा घेतला. स्वच्छतेबाबत नवी मुंबईचे कामही इतरांनी अनुकरण करावे असे असल्याचे मत उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी यावेळी व्यक्त केले.
नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील व महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी महानगरपालिकेच्या वतीने त्यांचे स्वागत केले. सफाई कामगारांच्या विविध मागण्यांबाबत आयोग सकारात्मक काम करीत असून शासन मंजूरीशी संबंधित बाबींवर आयोग प्रभावीपणे पाठपुरावा करील असे ते म्हणाले पंचवीस वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा झालेल्या सफाई कामगारांना मोफत सदनिका देण्याबाबतच्या शासन निणर्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने सिडकोकडे जागा उपलब्धतेसाठी आयोगामार्फतही प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. नवी मुंबई महापालिकेत यांत्रिकी पध्दतीने मलनि:स्सारण वाहिन्यांची सफाई आधीपासूनच केली जात असून दूषित गटारांमध्ये एकाही कामगाराचा मृत्यू झालेला नाही तसेच स्वच्छतेबाबत नवी मुंबईचे कामही इतरांनी अनुकरण करावे असे असल्याचे मत उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी व्यक्त केले.
यावेळी सफाई कामगारांच्या संघटना व सफाई कामगारांशी चर्चा केल्यानंतर संघटनांनी उपाध्यक्षांकडे दिलेल्या निवेदनास अनुसरुन त्यांनी मागणी केलेल्या विषयांबाबत महापालिका प्रशासनाने एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. कंत्राटी कामगारांना कायम करण्याबाबत शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात येईल असेही उपाध्यक्षांनी प्रत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले. पुढच्या दौऱ्यात सफाई कामगारांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेत सफाई कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोग कटीबध्द असून त्यादृष्टीने कार्यवाही करीत असल्याचे स्पष्ट करीत महाराष्ट्र राज्य सफाई आयोगाचे उपाध्यक्ष श्री.मुकेश सारवान यांनी धुलाई भत्ता व घाण भत्ता यामध्येही वाढ करावी असे सूचित केले.
आढावा बैठकीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ.राहुल गेठे यांनी आयोगाचे उपाध्यक्ष श्री.मुकेश सारवान यांचे स्वागत केले. याप्रसंगी अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माहितीचे सादरीकरण केले. यावेळी शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, प्रशासन विभागाचे उपायुक्त भागवत डोईफोडे, सहा.संचालक नगररचना . सोमनाथ केकाण, परिमंडळ 1 उपायुक्त सोमनाथ पोटरे व इतर विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai