श्रीपाद महात्मे यांना राज्यस्तरीय ‘गुरू गौरव’ पुरस्कार
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 09, 2021
- 519
नवी मुंबई ः खारघर येथे राहणार्या, मुंबईच्या जे.के.अकॅदमी ऑफ आर्टस अँड डिझाईन कला महाविद्यालयातील कलाध्यापक श्रीपाद महात्मे यांना पुण्याच्या आर्टबीट संस्थेतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘गुरू गौरव’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रा.महात्मे यांच्या 20 वर्षाच्या कला अध्यापनातील देदिप्यमान कामगिरीची दखल घेऊन हा गौरव पुरस्कार त्यांना जाहीर झाल्याबद्दल कलाक्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे. संगीत, कला विभागात आर्टस बिटस् फॉउंडेशनकडून हा पुरस्कार देण्यात येतो. वडाळाच्या जे.के.आर्ट अकादमीचे संस्थापक जे.के.जाधव यांचे नेहमीच शिक्षकांना प्रोत्साहन मिळत असल्यामुळे प्रा.महात्मे आपले कर्तुत्व सिध्द करीत आहेत. प्रा.श्रीपाद महात्मे हे कलाक्षेत्रात गेली अनेक वर्षे टायपोग्राफी, कँलीग्राफी, डिझाईन, आँर्किटेक्चर, या विषयावर सेमिनार आयोजित करतात. या व्याख्यानांसाठी भारतातल्या तसेच परदेशातल्या वेगवेगळ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात येते. महात्मे यांच्या विविध कलाकृतींना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. आता पुण्याच्या आर्टबीट संस्थेतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय गुरु गौरव हा पुरस्कार त्यांना जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai