...तर कोव्हिशील्डचा दुसरा डोस मिळणार मोफत
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 12, 2021
- 359
नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड लसीकरणाला गती दिली जात असून विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येते. तसेच आता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या नागरिकांनी कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस खाजगी रुग्णालय, कंपनी अथवा सोसायटी याठिकाणी घेतला असेल असे नागरिक पालिकेच्या लसीकरण केद्रांवर कोव्हिशील्ड लसीचा दुसरा डोस विनामूल्य घेऊ शकतात.
महानगरपालिकेच्या वतीने 18 वर्षावरील एकही लाभार्थी नागरिक लसीकरणापासून वंचीत राहू नये याची दक्षता घेतली जात आहे. या अनुषंगाने आधारकार्ड नसलेल्या नागरिकांसाठीही माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय, नेरुळ व राजमाता जिजाऊ रुग्णालय, ऐरोली येथील महापालिका रुग्णालयात लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. त्याचा लाभ 93 नागरिकांनी घेतला होता. अशाचप्रकारे आधारकार्ड नसलेल्या उर्वरित नागरिकांसाठी 12 ऑक्टोबर रोजी नेरुळ व ऐरोली या दोन्ही रुग्णालयांत सकाळी 9 ते 5 या वेळेत विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या नागरिकांनी कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस खाजगी रुग्णालय, कंपनी अथवा सोसायटी याठिकाणी घेतला असेल आणि पहिला डोस घेऊन ज्यांचे 84 दिवस पूर्ण झाले असतील असे नागरिक नवी मुंबई महानगरपालिकेच्या लसीकरण केद्रांवर कोव्हिशील्ड लसीचा दुसरा डोस विनामूल्य घेऊ शकतात. तरी नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन कोव्हीड 19 लस घेऊन संरक्षित व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai