वाशी ते खोपोली बसेसमध्ये वाढ
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 16, 2021
- 573
नवी मुंबई ः सर्वसामान्य प्रवाशी जनतेसाठी सार्वजनिक बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी नमुंमपा परिवहन उपक्रमामार्फत टप्प्याटप्प्याने संपूर्ण बस मार्गावरील बससंचलन पूर्ववत करण्यात येत आहे. त्यादृष्टीने वाशी ते खोपोली या एनएमएमटीच्या मार्ग क्रमांक 58 वरील बसेसमध्ये वाढ करण्यात आली आहे.
एनएमएमटी उपक्रमाचा मार्ग क्र. 58 हा वाशी सेक्टर 7 ते खोपोली असा कार्यान्वित आहे. सद्यस्थितीत या मार्गावर सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी 2 बसेसव्दारे प्रवाशी सेवा देण्यात येत होती. तथापि कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असल्याचे लक्षात घेता प्रवाशी जनतेच्या सततच्या मागणीनुसार या मार्गावर अंशत: बदल करून बसेस वाढविण्यात येत आहेत. या बदलामध्ये एनएमएमटी मार्ग क्रमांक 58 हा बस मार्ग वाशी सेक्टर 7 ऐवजी बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंत सिमित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बसेसमध्ये वाढ करून संपूर्ण दिवसाचे 7 -5 - 7 बसेस द्वारे प्रवाशी सेवा देण्यात येत आहे. याशिवाय दोन बस फेर्यांमधील कालावधी कमी करून आता 58 क्रमांकाच्या मार्गावर 30 ते 35 मिनिटांच्या प्रस्थांनातराने प्रवाशांना बस सेवा पुरविण्यात येत आहे. प्रवाशांना उत्तम आणि त्यांच्या सोयीची प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटिबध्द असून या बस सेवेचा लाभ सर्व प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai