माथाडी कामगारांचा संप
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 16, 2021
- 986
50 किलोवरील गोणी उचलण्यास नकार ; कांदा-बटाटा मार्केट बंद
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी माथाडी कामगारांनी अचानक बंद पुकारल्याने कांदा-बटाटा मार्केट बंद आहे. 50 किलोवरील गोणी उचलण्यास नकार देऊन पुकारलेल्या माथाडी कामगारांच्या या संपामुळे एपीएमसी बाजारपेठेबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
कांदा-बटाटा बाजारात दररोज 100 ते 120 गाड्ांची आवक होते. यात अनेक गोण्या या 50 किलोच्या वर असल्याने कामगारांना त्या उचलणे त्रासदायक होते. यामुळे माथाडी कामगारांना मानेच्या, पाठीच्या आजारांना सामोरे जावे लागते. यापुर्वी शासनानेही गोण्या 50 किलोच्या आत भरण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्याचे पालन होताना दिसत नाही. माथाडींच्या काही कामगार युनियनकडून 50 किलोच्या खाली भरण्याचे मागणी वारंवार करण्यात आली आहे. मात्र संबंधित प्रशासनाकडून किंवा काही व्यापार्यांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याचा फटका माथाडींना बसत आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक कांदा-बटाटा बाजारात 50 किलोहून अधिक वजनाच्या मालाची गोणी कामगार उचलणार नाही, अशी भूमिका माथाडी कामगारांनी घेतली आहे. आज अचानक बंद पुकारत माथाडी कामगारांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत पन्नास किलोहून अधिक वजनाच्या आलेल्या मालाच्या गोण्यांना कामगारांनी हातही लावला नाही. कामगार आपल्या निर्णयावर ठाम आहेत. यामुळे बाजार समितीने पन्नास किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या असल्याचे सांगत बाजार समितीच्या बाहेर मालवाहतूक गाड्या माथाडी कामगारांनी रोखून धरल्या आहेत. यावषयी लवकर निर्णय न घेतल्यास इतर भाजीपाल, फळ, धान्य मार्केटमध्येही कामबंद करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai