कोव्हीडमुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी अर्थसहाय्य वितरण
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 22, 2021
- 381
नवी मुंबई ः कोव्हीड कालावधीमध्ये कोव्हीडमुळे दोन पालक अथवा एक पालक दिवंगत झालेल्या मुलांच्या संगोपनाकरीता अर्थसहाय्य देणेबाबतची कल्याणकारी योजना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असून त्यामधील पात्र 55 लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण नवी मुंबई न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश तृप्ती देशमुख-नाईक आणि पालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. वाशी तालुका विधी सेवा समिती आणि नवी मुंबई वकिल बार असोशिएशनमार्फत डॉ.डी.वाय.पाटील विधी महाविदयालयात आयोजित कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमामध्ये बालदिनाचे औचित्य साधून बालकांसाठी असलेल्या या कल्याणकारी योजनेचे वितरण करण्यात आले.
कोरोना कालावधीत ज्या बालकांनी आपले एक अथवा दोन्ही पालक गमावलेले आहेत त्यांच्या संगोपनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची ही योजना अत्यंत चांगली असून आज या योजनेचे वितरण करताना अतिशय समाधान लाभत असल्याचे मत याप्रसंगी बोलताना नवी मुंबई न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश तृप्ती देशमुख-नाईक यांनी व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेने या योजनांच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला असून त्या मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी हे अर्थसहाय्य अतिशय मोलाचे ठरेल असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी सांगितले. प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी कोरोना काळात निराधार झालेल्या मुलांसाठी व महिलांसाठी महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती दिली.
दोन्ही पालक गमावलेल्या बालकास अर्थसहाय्य
वय वर्ष 0 ते 5 - रू. 2000 प्रतिमहा
वय वर्ष 6 ते 10 - रू. 4000 प्रतिमहा
वय वर्ष 11 ते 18 - रू. 6000 प्रतिमहा
एक पालक गमावलेल्या बालकास अर्थसहाय्य
वय वर्ष 0 ते 5 - रू. 1000 प्रतिमहा
वय वर्ष 6 ते 10 - रू. 2000 प्रतिमहा
वय वर्ष 11 ते 18 - रू. 3000 प्रतिमहा
कोव्हीडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या 18 ते 21 वयोगटातील बेरोजगार युवक / युवतींकरिता शैक्षणिक बाबी वगळून इतर बाबींच्या खर्चासाठी अर्थसहाय्य - रू. 50 हजार प्रतिवर्ष.
कोव्हीडमुळे पतीचे निधन झालेल्या महिलेस एकरक्कमी अर्थसहाय्य देणे - रू. 1.50 लक्ष अर्थसहाय्य.
कोव्हीडमुळे पतीचे निधन झालेल्या महिलेस स्वयंरोजगारासाठी साहित्य संच उपलब्ध करून घेणेकरिता अर्थसहाय्य करणे - स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलेस संपूर्ण हयातीत एकदाच रू. 1 लक्ष रक्कमेपर्यंतचे अर्थसहाय्य (दोन टप्प्यात).
कोव्हीडमुळे पतीचे निधन झालेली महिला या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र राहील.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai