करंजा बंदरातून 35 हजार मेट्रिक टन मासळी निर्यात
- by Aajchi Navi Mumbai
- May 27, 2026
- 22
उरण ः या करंजा मच्छिमार बंदरातून 2025 मध्ये 30 ते 35 हजार मेट्रिक टन इतक्या मासळीची निर्यात झाली असून ही राज्यातील निर्यातीच्या 10 टक्के निर्यात आहे. यावर्षी अनेक कारणांमुळे मासळीची आवक कमी असली तरीही निर्यातीत मात्र वाढ झाली असल्याची माहीती मासळी निर्यातदारांनी दिली आहे. मात्र आता पावसाळी बंदीमुळे करंजा बंदरातील मासळी निर्यात बाजार ही बंद झाला आहे.
करंजा बंदर हे देशातील सर्वात मोठे मासळी निर्यातीचे हब बनू पहात आहे. यात अरबी समुद्रातून पकडलेल्या रिबन फिश,कटल, माकोल, नळ, कुपा, बांगडा आदी प्रकारच्या मासळीची निर्यात युरोप,थायलंड,व्हिएतनाम,हाँगकाँग,सिंगापूर, मिडल ईस्ट आधी भागात पोहचली आहे. नव्याने निर्माण झालेल्या करंजा मच्छीमार बंदरातून 600 कोटींपेक्षा अधिकची निर्यात केली जात आहे. यावर्षी बंदरातून 30 ते 35 मेट्रिक टन मासळीची निर्यात करण्यात आली असल्याची माहिती निर्यातदारांनी दिली आहे. ही मासळी अमेरिका,चीन थायलंड तसेच आशिया वन युरोप खंडातील अनेक देशात निर्यात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मासळी बंदर आणि त्यावर आधारित विविध प्रकल्पांमुळे करंजा परिसरात विविध प्रकारच्या छोट्या-मोठ्या लघु उद्योगात वाढ झाली आहे. त्यामुळे बंदरातील 450 मासेमारी बोटी, त्यावर आधारित 2 हजार कुटुंबाना लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे या बंदरामुळे येथील स्थानिक बेरोजगारांना बऱ्यापैकी रोजगारही उपलब्ध होऊ लागला आहे.
राज्यातील सर्वात मोठी मच्छीमार सहकारी संस्थांही करंजातच आहे.वार्षिक सुमारे 100 कोटींची उलाढाल असलेल्या या मच्छीमार संस्थेच्या माध्यमातून डिझेल पुरवठा केला जात आहे. मच्छीमारांसाठी लागणारे साहित्य किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यासाठी दुकानही सुरू आहेत. करंजा येथुन काही वर्कशॉप्समध्ये तयार करण्यात येणारे मच्छीमार बोटींसाठी लागणारे पंखे,टनट्युब, सॉफ्ट आदी यांत्रिक साहित्याला थेट विदेशातून मोठी मागणी आहे.असे यांत्रिक साहित्य विदेशात पाठवले जाते. 1 जून पासून मासेमारी हंगाम दोन महिन्यांसाठी बंद होणार असून सद्या 90 टक्के मासेमारी बोटींनी करंजा बंदरात नांगर टाकला असल्याची माहीती करंजा संस्थेचे माजी उपाध्यक्ष रमेश नाखवा यांनी दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai