मोठीजुई शाळेत तालुक्यातील पहिली ‘आयडियल क्लासरूम’
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 22, 2026
- 26
उरण ः रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा मोठीजुई येथे उरण तालुक्यातील पहिल्या आयडियल क्लासरूम चे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
विद्यार्थ्यांना आधुनिक, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, तसेच वर्गातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी व्हावी, या उद्देशाने शाळेत आयडियल क्लासरूमची निर्मिती करण्यात आली आहे. या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक साधनांच्या माध्यमातून विविध विषयांचे ज्ञान अधिक सोप्या व मनोरंजक पद्धतीने घेता येणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जि. प सदस्य डॉ. मनिष ठाकूर,अविनाश ठाकूर ,प.स सदस्य दिपक भोईर,प्रारंभी गावंड,रमाकांत पाटील, गटशिक्षणाधिकारी सागर पवार, केंद्र प्रमुख हसन आवटे, मुख्याध्यापक अविनाश नवाले, ग्रामविकास अधिकारी रुपम गावंड, व्यवस्थापन अध्यक्ष लक्ष्मण भोईर, अमृता भोपी, योगेश भोईर,शशिकांत भोईर,रसिका भोईर, प्रमिला भोईर, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपक्रमशीळ शिक्षक कौशिक ठाकूर,यतीन म्हात्रे, विश्वनाथ गावंड, अंकुश पाटील,काजल पाटील यांनी मेहनत घेतली. यावेळी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. आयडियल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना मिळून त्यांच्यामध्ये नव्या पद्धतीने शिकण्याची उत्सुकता निर्माण होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. उरण तालुक्यातील पहिल्या आयडियल क्लासरूमचा मान मिळाल्याने रायगड जिल्हा परिषद अ
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai