मालमत्ता करास भूमिपुत्रांचा विरोध
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 03, 2021
- 836
नवी मुंबई ः पनवेल महापालिकेने लागू केलेल्या नवीन मालमत्ता कर प्रणालीला भुमीपुत्रांनीही विरोध दर्शवला आहे. शुक्रवारी ग्रामस्थ मंडळ कोपरा गावं नवी मुंबई यांनी पनवेल महापालिकेच्या मार्फत सन 2016 ते 2021 या कालावधीत बजावण्यात आलेल्या जिझिया मालमत्ता कराच्या विरोधात येथे अॅड सुरेश ठाकूर यांच्या अध्यक्षेखाली सभा आयोजित केली होती. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आपली भुमिका स्पष्ट केली.
कोपरा समाज मंदिरात पार पडलेल्या सदर सभेस मोठया संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. गेल्या पाच वर्षात पालिकेने कचरा वाहतुक या पलीकडे काही काम न करता न केलेल्या कामाची देयके ग्रामपंचायत पेक्षा चार ते पाच पट जादा दराने बजावली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये पनवेल मनपा विरोधात प्रचंड असंतोष झाला आहे. गेल्या पाच वर्षांपासून पनवेल महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या जमा खर्च याबाबात कोणताही अहवाल प्रसिद्ध केला जात नाही. नागरिकांच्या क्षेत्र सभा न घेताच बेकायदेशररित्या खर्च करण्यात येत आहे. भूमिपुत्रांच्या त्यागातून पनवेल मनपास कोट्यवधी रुपयांची मालमत्ता मोफत मिळाली असल्याने भूमिपुत्रांच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करावा अशी मागणी सदर बैठकीत एकमुखाने करण्यात आली. जोपर्यंत गेल्या पाच वर्षांत पनवेल महापालिकेच्या वतीने गावामध्ये करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील लेखाजोखा जनतेसमोर मांडले जात नाही तोपर्यंत कोणीही मालमत्ता कर भरणार नाही अशी घोषणा करण्यात आली.
एकीकडे तळोजा येथील उद्योग समूहांना तसेच कळंबोली स्टील मार्केट व्यापार्यांना करमाफी देऊन भूमिपुत्रांच्या खिशाला कात्री लावून भूमिपुत्रांची लूट करण्याचा पनवेल महापालिकेच्या प्रशासनाचा डाव सफल होऊ देणार नसल्याची व त्याविरोधात खारघर ते पनवेल लाँग मार्च करण्याचे घोषणा यावेळी अॅड सुरेश ठाकूर यांनी केली. सभेस संतोष गायकर, अॅड तोडेकर गुरूनाथ गायकर, रमाकांत पाटील गोटिरामशेठ तोडेकर सुरेश ठाकूर मदन पवार मयेकर जगदीश ठाकूर गोटिराम म्हात्रे आदि व खारघर बेलपाडा मुर्बी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai