सरकारी जमिनीचे संपादन?
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 03, 2021
- 789
वाघिवली भुसंपादन प्रक्रियेच्या चौकशीसाठी समिती
नवी मुंबई : आसूडगाव येथे नसलेल्या भुखंडाचे झालेले भुसंपादन ‘आजची नवी मुंबई’ ने उघडकीस आणल्यानंतर वाघिवली येथे अशाच प्रकारचे भुसंपादन झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पनवेलचे विभागीय अधिकारी यांनी मुंदडा परिवाराची संपादीत झालेली स.नं.148 ही जमिन सरकारच्या ताब्यात असल्याचा अहवाल देऊनही या संपादनापोटी मुंदडा परिवारास 53 200 चौ.मी.चा भुखंड देण्यात आल्याने विभागीय कोकण आयुक्त विलास पाटील यांनी याबाबत स्वंतत्र चौकशी समिती नेमली आहे.
वाघिवली गावातील मुंदडा परिवाराची जमिन सिडकोने संपादीत करुन त्या मोबदल्यात साडेबार टक्के योजनेअंतर्गत 53200 चौ. मी. भुखंडाचे वाटप त्यांना सीबीडी येथील पारसिक हिलवर केले होते. हा भुखंड मुंदडा परिवाराने नवी मुंबईतील नामवंत विकासक भुपेन शहा यांच्या मालकीच्या भुमिराज ग्रुप यांना विकला होता. तेथे भुमिराज हिल्स प्रकल्प उभारण्याची तयारी संबंधित विकासकाने केली होती. हे भुखंड वाटप सुरुवातीपासूनच वादात सापडले आहे. या वाटपाबाबत जमिनीवरील कुळांनी आक्षेप घेऊन मुंदडा परिवाराच्या मालकीहक्काबाबत प्रश्नचिन्ह उभे केले होते. जिल्हाधिकारी रायगड यांनी याबाबत तहसीलदार पनवेल यांच्याकडून अहवाल मागवला असता पनवेलचे विभागीय अधिकारी दत्तू नवले यांनी स.नं.148 ही संपादित जमिन सरकारच्या ताब्यात असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी रायगड यांना दिला होता. अतिरिक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी हा अहवाल अर्थपुर्ण हेतूने दाबून ठेवल्याची चर्चा सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. भरत शितोळे हे यापुर्वी कोयना प्रकल्पग्रस्तांना खारघर येथील 1600 कोटींचा भुखंड वाटप करण्याच्या प्रकरणात अडकले होते. शासनाने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायधीशांमार्फत चौकशी समिती नेमल्यावर हे भुखंड वाटप रद्द करण्यात आले. याही प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते पंढरीनाथ साबळे यांनी तक्रार केल्यावर विभागीय कोकण आयुक्तांनी याबाबत उच्च स्तरीय चौकशी समिती नेमुन 31 डिसेंबरपर्यंत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
- भरत शितोळेंच्या अडचणीत वाढ
पनवेलचे तत्कालीन विभागीय अधिकारी दत्तू नवले यांनी सदर जमिन सरकारच्या ताब्यात असलेला दिलेला अहवाल दडपून ठेवला. यापुर्वी त्यांनी अशाचप्रकारचे भुखंड वाटप कोयना प्रकल्पग्रस्तांना केले होते. उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींच्या अहवालानंतर हे भुखंड वाटप रद्द करण्यात आले. - अशी असणार समिती
रायगड अति. जिल्हाधिकारी अमोल यादव हे अध्यक्ष
उप-जिल्हाधिकारी सुषमा सातपुते सदस्य सचिव
पनवेल विभागीय अधिकारी राहुल मुंडके व भुमी अभिलेख सचिन इंगळे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai