...आणि कार चालकाचे प्राण वाचले
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 11, 2021
- 759
खारघर ः पडघा फाटा येथे एका धावत्या पांढर्या रंगाच्या कारच्या समोरच्या भागात अचानक स्पार्क होवून कारने पेट घेतली. मात्र कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे कार चालकाचे प्राण वाचले आहे. कार चालकास किरकोळ दुखापत झाली असून तो सुखरूप आहे.
तळोजा एमआयडीसी मधील नो पार्किंग रस्त्यावर उभी केल्या जाणार्या वाहन चालकावर तळोजा वाहतूक पोलिसांकडून शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास कारवाई सुरु होती. दरम्यान,पडघा फाटा येथे एका कारने अचानक पेट घेतला. यावेळी कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी चंद्रशेखर वाघ, ललित शिरसाठ या दोघांनी धाव घेवून कार चालकास तात्काळ बाहेर काढले. तेवढ्यात रस्त्यावरून पाण्याचा टँकर जात असल्याचे दिसताच तो टँकर अडवून टँकरच्या पाण्याने आग आटोक्यात आणली. सदर कामात अडथळा येवू नये म्हणून वाहतूक कर्मचारी आनंद बिराजदार आणि राहुल कातरा यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने आणि नागरिकांना रोखून धरले. वाहतूक पोलिसांनी वेळीच पेट घेतलेली कार वेळीच टँकरच्या पाण्याने आग आटोक्यात आणली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai