एसआरआय, जनगणना, स्वच्छता कामकाजाचा आढावा
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 17, 2026
- 21
विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक
पनवेल ः कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या उपस्थितीत जनगणना, मतदार यांद्यांशी संबधित विशेष सखोल फेरतपासणी, घनकचरा व्यवस्थापन, बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प या विषयांबाबत आढावा बैठक पनवेल महापालिका मुख्यालयात घेण्यात आली.
पनवेल महानगरपालिका महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे यांनी विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध समस्यांविषयी चर्चा केली. महापौर तसेच पनवेल मनपा आयुक्त यांनी यावेळी पनवेल महापालिका क्षेत्रातील पाणी समस्या आणि उपाययोजनांबाबत माहिती विभागीय आयुक्तांना दिली. यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत मतदार यांद्यांशी संबधित विशेष सखोल फेरतपासणी कामाचा आढावा घेऊन काम करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजनांविषयी चर्चा केली. एसआयआर चे कामकाज वेगाने करणे आवश्यक असल्याचे सांगत याबाबत सूचना दिल्या. पनवेल महापालिकेच्या जनगणना विषयक कामकाजाची सध्यस्थिती जाणून घेत समाधान व्यक्त केले. जनगणना प्रक्रियेची तयारी, आवश्यक मनुष्यबळ, विविध विभागांमधील समन्वय तसेच जनगणना कामकाजाच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीबाबत तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कार्यक्षमतेविषयीही सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्तांनी संबंधित विषयांबाबत आवश्यक सूचना देऊन समन्वय ठेवून कामे वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच जनगणना आणि स्वच्छता व्यवस्थापनाशी संबंधित कामांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai