मान्सून पूर्वतयारीचा महापौरांकडून आढावा
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 17, 2026
- 25
पनवेल महापालिकेची शासनाच्या विविध विभागांसोबत बैठक
पनवेल ः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात मान्सून पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थानाचा आढावा महापौर नितीन पाटील यांनी घेतला नुकताच घेतला. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी महापालिका, पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन या तीन प्रमुख विभागा बरोबरच सर्व संबधित विभागांमध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याचे महापौर नितीन पाटील यांनी सांगितले.
महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातील बैठक कक्षात यासंदर्भात आयोजित नियोजन बैठक (8जून) घेण्यात आली. यावेळी महापौरांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चारही प्रभागातील मॅन होलची तपासणी करून दुरूस्तीकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने विविध विभागातील अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, वॉकीटॉकीचा प्रभावी वापर तसेच आपत्कालीन कामकाजाचे प्रशिक्षण सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना द्यावे अशा सूचना दिल्या. यावेळी महापालिकेची मान्सुनपूर्व व आपत्कालीन परिस्थितीसाठी महापालिकेने केलेल्या तयारीची माहिती परिवहन विभागाचे व्यवस्थापक कैलास गावडे यांनी दिली. पोलिस प्रशासनाच्या तयारीबाबत सांगताना वरिष्ठ पोलिस परिक्षक नितीन ठकारे यांनी आपत्कालीन मदतीसाठी जॅकटेस, बोटी, आपत्कालीन मदतीसाठी पथके सज्ज असल्याचे सांगितले. कोळी बांधवाचे नेटवर्क तसेच 112 क्रमांकाच्या साहाय्याने तात्काळ मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सिडको प्रशासनाने होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडीट, आपत्कालीन ऑपरेशन सेंटर, तसेच इतर अनुषंगिक कामे सुरू असल्याची माहिती दिली. वीजेच्या तारांमधील येणाऱ्या झाडांच्या फांद्याची छाटणी, आवश्यक ठिकाणी केबल अंडर ग्राऊंड करणे, तक्रारींचे निवारण करण्यासाठी 24 तास सेवा सुरू असल्याचे वीज वितरण विभागाच्या वतीने सांगितले. वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने उपायुक्त स्वरूप खारगे यांनी आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार धोकादायक झाडांच्या छाटणीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले.
नाले सफाईची कामे वेगाने सुरू असून यासाठी नाले सफाईसाठी 23 जेसीबी, 15 पोखलँड, 750 मनुष्यबळ, 22 हायवा व इतर मशिनरी द्वारे काम सुरू असल्याचे सांगितले. नाले सफाईची कामे अंतिम टप्पयात असून याबरोबर पनवेल व कामोठेमध्ये 40 पंप, कळंबोली व खारघर प्रभागात 19 पंप बसविण्यात आल्याचे उपायुक्तांन डॉ. वैभव विधाते यांनी सांगितले. पूर परिस्थिती हातळण्यासाठी 40 अग्निशामकांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडके यांनी दिली. तसेच पावसाळ्यांच्या पार्श्वभूमीवर टिम व सर्व आवश्यक वाहने, बोटी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. एनडीआरएफच्या वतीने आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी 4 रेस्क्यू टिम असल्याची माहिती दिली. सर्व आवश्यक अत्याधुनिक मशिनरी मदतीसाठी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती साथरोगासारखे विकार उद्भवल्यास तयारीच्या दृष्टीने औषधसाठा व इतर वैद्यकिय सेवासुविधांची सोय करण्यात आली असून सर्व 26 आरोग्य केंद्रामध्ये रॅपिड रिस्पॉन्स टिम उपलब्ध असून, पालिका क्षेत्रातील सर्व खाजगी रूग्णालयांना देखील आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार सेवा देणेबाबत निर्देश देण्यात आल्याची माहिती मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली. महसूल विभागाकडून देखील आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व मान्सुनपूर्व तयारी झाल्याची माहिती नायब तहसीलदारांनी दिली. या बैठकीस उपस्थित सर्व महापालिका पदाधिकारी , सदस्य व विविध विभागांतील अधिकाऱ्यांचे आभार मानून बैठकिचा समारोप उपायुक्त स्वरूप खारगे यांनी केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai