पालिकेच्या कामगारांना बेदम मारहाण
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 15, 2021
- 479
नवी मुंबई ः महापे येथे महानगरपालिकेचे वृक्ष छाटणी कामगार हे झाडांची छाटणी करत असताना अचानक स्थानिक नागरिकांकडून झाड छाटणी केल्याच्या कारणावरून तीन कामगारांना बेदम मारहाण करण्यात आली. यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हल्ला करणार्या नागरिकांवर गुन्हा नोंदवावा अशी मागणी मनसे कामगार युनियनने केली आहे.
झाडांच्या नको अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या वेळोवेळी पालिकेकडून छाटण्यात येतात. मंगळारी महापे येथे पालिकेचे वृक्षछाटणी कामगार झाडांची छाटणी करत असताना स्थानिकांनी त्यांना बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे उद्यान अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन कामगारांना मनपा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेसंदर्भात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता रात्री 8 वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मनसे कामगार कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष अमोल आयवळे व सरचिटणीस अभिजीत देसाई यांनीही घटनास्थळी जावून, कामगारांची विचारपुस करुन संबंधित नागरिकांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. पोलीसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता गुन्हा दाखल न केल्यास मनसे युनियन रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी दिला. तसेच वृक्ष छाटणी सुरू असताना अधिकार्यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते तरीही अधिकारी उपस्थित नसल्याने अधिकार्यांनीही हलगर्जीपणा केल्याचा आरोप मनसे युनियननी करत अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. काही दिवसांपुर्वीही पालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकार्यांवर फेरीवाल्यांनी हल्ला केला होता. वारंवार अशा घटना घडत असल्याने पालिका अधिकारी व कर्मचार्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai