‘आप’ला मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 20, 2021
- 938
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सर्वपक्षीय कंबर कसून कामाला लागले आहेत. महाआघाडी, भाजपा सह आप ने निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली असून निवडणूक जिंकण्यासाठी कानमंत्र कार्यकर्त्यांना देण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभुमीवर 19 डिसेंबरला विष्णुदास भावे सभागृहात ‘आप’ला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबईतील आपच्या या पहिल्या मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने आप नवी मुंबईचे निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी ह्यांच्या चेहर्यावर समाधान दिसून येत होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिल्लीचे सलग 3 वेळा निवडून आलेले आमदार विशेष रवी जी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अरविंद केजरीवाल यांच्या जनताभिमुख कार्याची महिमा संपूर्ण देशात पसंती मिळवत आहे, ‘आम आदमी’ ला आम आदमी पसंत आहे नेता नाही, म्हणून आपली ओळख निर्माण करा असा मोलाचा सल्ला देऊन नवी मुंबई टीमला शुभेच्छा दिल्या. आप सामान्य नागरिकांना ज्या मोफत सुविधा देत आहे, त्या मोफत नसून त्यांनीच भरलेल्या कराच्या रक्कमेचा योग्य वापर करुन जनतेचा फायदा करून देत असल्याचे धर्मेश भंडेरी (विरोधीपक्ष नेते- सुरत महानगरपालिका) यांनी सांगितले. वेळेला फार महत्व असते असे अधोरेखित करत महाराष्ट्रचे संयोजक रंगभाऊ राचुरे यांनी समाज मनावर ‘आप’चा परिवार वाढत आहे असून आज विष्णूदास भावेत याची प्रचिती येते असल्याचे सांगून प्रत्येक कार्यकर्त्याला एक जुटीने कामांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. नवी मुंबई महानगर पालिका निवडणुकीत नवीन त्रीस्तरीय पॅनल पद्धतीच्या पार्श्वभूमीवर ‘तीन बटणे झाडूची-शून्य भ्रष्टाचाराच्या केजरीवाल क्रांतीची’ हे घोषवाक्य ठरवून, ईव्हीएमवरील तीन झाडूच्या बटनाचं महत्व सांगितले. छत्रपतींच्या सुराज्याच्या संकल्पनेवर आणि बाबासाहेबांच्या संविधानावर निष्ठा असणार्या, तडफदार, सुसंकृत, सुशिक्षित, धर्मनिरपेक्ष आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मेहनतीची कमाई खाणार्या तरुणाची फौज म्हणजे आम आदमी पार्टी. अशा पार्टीच्या कामामध्ये एक कार्यकर्ता म्हणून खारीचा वाटा उचलण्याची संधी मला मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो असे प्रतिपादन यावेळी श्यामभाऊ कदम, कार्यकारी अध्यक्ष, आप नवी मुंबई यांनी केले. या कार्यक्रमात नवी मुंबईतील समाजसेवकांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. उत्स्फुर्त प्रतिसादामुळे यशस्वीपणे पार पडलेल्या ‘आप’ला मेळाव्यामुळे आप नवी मुंबईच्या कार्यकत्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai