आमदार निधीतून ऑक्सिजन प्लांट
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 07, 2022
- 492
आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला 1 कोटींचा आमदार निधी
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतील तरतूद केलेले रु.1 कोटी व नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. याचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी वाशी येथील सिडको एक्झिबिशन कोविड केयर सेंटर येथे नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या हस्ते पार पडला.
सदर ऑक्सिजन प्लांटची क्षमता 1200 एलपीएम असून दिवसाला 225 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर म्हणजेच दिवसाला 2.24 मॅट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होणार असल्याचे तसेच दिवसाला 150 ते 170 नागरिकांना लाभ मिळणार आहे. यावेळी आ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, कोरोना काळात ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. नागरिकांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये याकरिता ऑक्सिजन प्लांट उभारण्याकरिता मी माझ्या आमदार निधीतून रु. 1 कोटींची तरतूद केली होती. पालिकेनेही त्वरित कार्यवाही करून ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केल्याने नवी मुंबईकरांना दिलासाही मिळाला आहे. माझ्या मतदारसंघातील एकही नागरिक आरोग्य सुविधेशिवाय वंचित राहणार नाही, हे एक आमदार म्हणून माझे प्रथम कर्तव्य आहे. अजूनही आरोग्य सुविधा पुरविण्याकरिता कोणतीही आवश्यकता असल्यास त्याकरिताही आमदार निधीची तरतूद करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी सभापती डॉ.जयाजी नाथ, सभागृह नेते रवींद्र इथापे, नगरसेवक गिरीश म्हात्रे, निशांत भगत, महामंत्री निलेश म्हात्रे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, महिला अध्यक्ष दुर्गा ढोक, विकास सोरटे, सुहासिनी नायडू, राजेश राय, कल्पना छत्रे, जगन्नाथ जगताप, पांडुरंग आमले, जयवंत तांडेल, राजू तिकोने, जनार्दन सुतार, न.मुं.म.पा. शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त बाबासाहेब राजळे, अधिकारी अरविंद शिंदे तसेच असंख्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai