हेरिटेज वृक्षांची गणना होणार
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 08, 2022
- 408
नवी मुंबई ः आजवर ऐतिहासिक इमारती, किल्ले, पुरातन वास्तू यांना हेरिटेज दर्जा देण्यात आलेला आहे. मात्र आता झाडांनाही हेरिटेज वृक्षांचा दर्जा प्राप्त होणार असून त्यासाठी 50 वर्षांवरील आयुष्यमान असणार्या झाडांना ग्राह्य धरले जाणार आहे. त्याकरिता स्थानिक प्राधिकरणांनी अशा झाडांची माहिती राज्य सरकारला द्यावी लागणार आहे. आणि तसा आदेश पारित झाल्याने नवी मुंबई शहरातील अशा वृक्षांची मोजणी करून त्यांचे जतन केले जाणार आहे. एखादा प्रकल्प राबवताना त्यात 200 पेक्षा अधिक झाडे अडथळा ठरत असतील तर ती झाडे तोडणे अथवा स्थलांतर करण्याबाबत राज्य वृक्ष समितीची परवानगी अनिवार्य आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात देखिल वृक्षांच्या गणनेसोबत हेरिटेज वृक्षांची स्वतंत्र गणना होणार, अशी माहिती अधिकार्यांकडून मिळाली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai