पनवेलच्या उपमहापौरपदी सीता पाटील
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 12, 2022
- 638
पनवेल ः महापालिकेच्या उपमहापौरपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या सीता पाटील विजयी झाल्या. तर स्थायी समिती सभापतीपदी भाजपचेच अॅड. नरेश ठाकूर तर महिला आणि बालकल्याण समिती सभापतीपदी भाजपच्या हर्षदा उपाध्याय यांची बिनविरोध निवड झाली आहे.
ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या निवडणुकीत भाजप उमेदवाराला 50 तर विरोधी पक्ष असलेल्या शेकाप आघाडीला 27 मते मिळाली आहेत. नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपमहापौर पदासाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून नगरसेविका सीता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर विरोधीपक्षांच्या आघाडीकडून नगरसेविका प्रीती जॉर्ज यांची उमेदवारी घोषित करण्यात आली होती. दोन्ही पक्षाकडील नगरसेवकांमध्ये नाराजी नाट्य उफाळून आल्याने मते फुटण्याच्या भीतीने पक्षश्रेष्ठींनी नगरसेवकांना व्हीप बजावले होते. प्रभाग समित्या भाजपकडे उपमहापौर पदासोबतच मंगळवारी चार प्रभाग समित्या सभापती पदासाठी निवडणूक झाली. या वेळी विरोधी पक्षाकडून केवळ ब प्रभाग समिती करताच उमेदवारी देण्यात आल्याने इतर 3 प्रभाग समित्या बिनविरोध होऊन याठिकाणी भाजपच्या नगरसेवकांची बिनविरोध वर्णी लागली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai