केबीपी कॉलेजमधील शैक्षणिक दस्ताऐवज गहाळ
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 17, 2022
- 829
नवी मुंबई ः वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्येे शिक्षण घेतलेल्या मुलांचा शैक्षणिक डाटा उपलब्ध नसल्याचे उत्तर पालिका प्राचार्य शुभदा नायक यांनी दिले आहे. कॉलेजच्या या बेजबाबदार वागणुकीमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षणाचे स्वप्न भंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत मुंबई विद्यापीठ संबंधित महाविद्यालयावर कोणती कारवाई करते याकडे आता सर्व माजी विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई 1979 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या विद्यमाने मॉर्डन कॉलेज वाशी या नावाने महाविद्यालय सुरू करण्यात आले. या महाविद्यालयात सुरुवातीला विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीन शाखांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी स्थानिक विद्यार्थ्यांना मिळाली. कालांतराने महाविद्यालयाने प्रगती करत अनेक वेगवेगळ्या शिक्षणाच्या शाखा सुरू करून नवी मुंबईतील विद्यार्थ्यांना विद्यार्जनासाठी मोठे दालन उपलब्ध करून दिले. आजतागायत लाखो विद्यार्थ्यांनी येथून पदवी संपादन करून आपला भविष्यकाळ उज्वल केला आहे. या कॉलेजमधून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी आज जगाच्या कानाकोपर्यात आपल्या या ज्ञानाचा ठसा उमटवत आहेत. या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक डाटा जपून ठेवणे हे महाविद्यालयाचे काम आहे. ज्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेण्याची आवश्यकता असते त्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक डाटाची गरज भासू शकते. एखाद्या विद्यार्थ्यांकडून त्याच्या मार्कशीट गहाळ झाल्यास त्याला कॉलेजकडून उपलब्ध दस्ताऐवजच्या साहाय्याने डुप्लीकेट मार्कशीट उपलब्ध करून देण्यात येतात.
काही विद्यार्थ्यांनी विधी शाखेच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी केबीपी कॉलेजकडून त्यांच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या मार्कशीट मागितल्या. मात्र, कॉलेजच्या प्राचार्या शुभदा नायक यांनी कॉलेजकडे डाटा उपलब्ध नसल्याचे त्यांना कळवले. कॉलेजच्या या उत्तरामुळे संबंधित विद्यार्थ्यांची पायाखालची जमिन घसरली. विद्यार्थ्यांनी याबाबत मुंबई विद्यापीठाचे संचालक विनोद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित मार्कशीट उपलब्ध करून देणे हि कॉलेजची जबाबदारी असल्याचे सांगितले. याबाबत पुन्हा संबंधित विद्यार्थ्यांनी प्राचार्यांशी संपर्क केला असता त्यांनी आपले हात वरती केले आहेत. कॉलेजच्या या गलथान कारभारामुळे विधी शाखा प्रवेशाच्या पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागूनही विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे शक्य झाले नाही. त्याबाबत काही विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला असून संबंधित महाविद्यालयावर मुंबई विद्यापीठाने कारवाई करावी आणि हरवलेला डाटा पुन्हा जमा करावा म्हणून मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. मुंबई उच्च न्यायालय व मुंबई विद्यापीठ, वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज प्रशासनावर कोणती कारवाई करते याकडे आता संबंधित विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
- विद्यार्थ्यांना गुणपत्रक देणे महाविद्यालयाची जबाबदारी
1. विद्यार्थ्यांचे गुणपत्रकांचे दस्ताऐवज सांभाळणे व विद्यार्थ्यांना ते वेळोवेळी उपलब्ध करुन देणे ही महाविद्यालयाची जबाबदारी असल्याचा मुंबई विद्यापीठाच्या संचालकांचा खुलासा
2. केबीपी महाविद्यालय वाशीच्या गलथान कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांचे पद्व्युत्तर शिक्षण धोक्यात
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai