एपीएमसीत मुख कर्करोगाचे 75 संशयित रुग्ण
- by Aajchi Navi Mumbai
- May 29, 2026
- 17
नवी मुंबई ः वाशी येथील एपीएमसी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय मुख कर्करोग पूर्वतपासणी शिबिरातून धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. या वेळी तपासणी करण्यात आलेल्या 389 जणांपैकी 75 जणांमध्ये मुखाच्या कर्करोगाची लक्षणे आढळून आली. त्यापैकी 21 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने ‘बायोप्सी’ चाचणीसाठी संदर्भित करण्यात आले.
जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एपीएमसी सचिव शरद जरे यांच्या पुढाकाराने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. टाटा मेमोरियल सेंटर आणि वर्ल्ड ॲग्रो केअर फाउंडेशन यांनी मसाला आणि फळ बाजारात ही तपासणी केली. तंबाखूमुळे होणाऱ्या गंभीर आजारांचे लवकर निदान आणि जनजागृती व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
शिबिरातील निष्कर्षांवरून एपीएमसी परिसरात काम करणारे माथाडी कामगार, मापाडी, सफाई कर्मचारी आणि व्यापाऱ्यांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढल्याचे स्पष्ट झाले.
मात्र, बाजार आवारातील मोठ्या गर्दीच्या तुलनेत तपासणी शिबिराला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत वैद्यकीय पथकाने व्यक्त केली. पानटपऱ्यांवर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ खरेदीसाठी मोठ्या रांगा दिसत असताना आरोग्य तपासणीबाबत मात्र अनास्था दिसून आल्याचे निरीक्षण वैद्यकीय पथकाकडून व्यक्त करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai