पोलिस उपायुक्त मेंगडे यांना पर्यावरण संवर्धन पुरस्कार
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 08, 2022
- 446
नवी मुंबई : वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन व ऊर्जा बचत क्षेत्रात गेली 15 वर्ष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मेंगडेवाडी - निरगुडसरचे सुपुत्र तथा नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त सुरेश सावळेराम मेंगडे यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पर्यावरण संवर्धन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय नागरी पर्यावरण संरक्षण संस्थेच्या वतीने राजभवन येथे नुकताच पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. (ता. तासगाव जि.सांगली) या दुष्काळी परिसरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष होते. अशा ठिकाणी मेंगडे व त्यांच्या सहकार्यांनी दूरवरून पाणी आणण्याची व्यवस्था करून तेथील पडीक व खडकाळ जमिनीवर दोन हजार 500 वृक्षांची लागवड केली. त्यामुळे या प्रशिक्षण केंद्रास 2013 मध्ये ‘वनश्री पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे हे सध्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यरत असून या ठिकाणी देखील त्यांनी कांदळवन र्हास व अतिक्रमण थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. या कामाची दखल उच्च न्यायालयाने घेतली होती. पोलीस खात्यातील आपली जबाबदारी सांभाळून त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठीही सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai