महामार्गासाठी जमीन सर्वेक्षण सुरू
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 09, 2022
- 395
विरार-अलिबाग महामार्ग ; प्रांत अधिकार्यांना मागण्यांचे निवेदन सादर
उरण : दोन आठवड्यांपुर्वी विरार अलिबाग बहुद्देशीय महामार्गासाठी जमीन मोजणीसाठी गेलेल्या पथकाला बाधित शेतकर्यांनी आधी मोबदला नंतरच मोजणी, अशी भूमिका घेत विरोध केला. तीन ते चार वेळा प्रशासन व शेतकरी यांच्यात बैठक होऊनही तोडगा निघाला नाही. अखेर मोजणीसाठी शेतकर्यांनी दिलेल्या मुक संमतीनंतर मंगळवारपासून मोजणीचे काम सुरु करण्यात आले आहे.
विरार-अलिबाग महामार्गासाठी उरण तालुक्यातील जमीन संपादन करण्यात येणार आहे.मात्र आधी योग्य मोबदला द्या मगच जमीन मोजणी करा अशी भुमिका घेऊन शेतकर्यांनी जमिन सर्वेक्षणाला विरोध केला आहे. दोन आठवड्यापुर्वी येथे मोजणी केलेल्या पथकाला जोरदार विरोध करुन परत पाठवले. त्यानंतर प्रशासन व शेतकर्यांमध्ये तीन ते चार वेळा बैठक झाल मात्र तोडगा निघाला नाही. शेतकर्यांनी केलेल्या विरोधानंतर प्रांत अधिकार्यांनी मागण्यांचे निवेदन सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली होती. शेतकर्यांनी काही अटी-शर्ती व विविध मागण्यांचे निवदेन मंगळवारी प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांची भेट घेऊन सादर केले. या वेळी उरण तालुक्यातील बाधित 16 गावांतील 35 शेतकरी उपस्थित होते. निवेदन सादर करताना शेतकर्यांना जमिनीला सर्वाधिक भाव मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करताना सर्वेक्षण, मोजणीसाठी शेतकर्यांनी विरोध न करण्याची भुमिका घेत मुक समंती दर्शविली. त्यामुळे मंगळवारी पुन्हा एकदा शासनाकडून मोजणीला सुरुवात करण्यात आल्याची माहिती प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांनी दिली आहे. शेतकर्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले असून ते शासनापर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शासनाकडून करण्यात येणार्या मोजणीच्या वेळी शेताच्या बांधावर उभे राहू, मात्र शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या पंचनाम्यांवर शेतकरी म्हणून सह्या करणार नसल्याची भूमिका शेतकर्यांनी घेतली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai