अनधिकृत भाजीबाजार राजरोसपणे सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 12, 2022
- 521
ठोस कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
नवी मुंबई : वाशी येथील सेक्टर 15 मध्ये रोज अनधिकृत भाजी बाजार कारवाईअभावी राजरोसपणे भरत आहे. येथील फेरीवाले सुरक्षा रक्षकांचीही भिती बागळत नसल्याचे निर्दशनास दिसून येत आहे. त्यामुळे स्वच्छतेचे या परिसरात तीनतेरा वाजले आहे. या फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे तुकाराम मुंडे हे आयुक्त असताना वाशी सेक्टर 9 मधील भाजीबाजार वाशी बस डेपोच्या मागील बाजूस स्थलांतरित करण्यात आला. त्यानंतर अनधिकृत फेरीवाल्यांनी परिसरातील मोक्याच्या ठिकाणी भाजी विकण्यास सुरवात केली. महापालिकेतर्फे यावर कारवाई होत असते. परंतू, कारवाई नंतर पुन्हा बाजार भरतो. काही महिन्यांपासून सेक्टर 15 मधील दत्तगुरूनगर बाहेरील पदपथावर भाजी विक्रेते सकाळच्या वेळेस राजरोसपणे बाजार भरवत आहेत. सुरक्षा रक्षकांना याठिकाणी कारवाई करण्यासाठी नियुक्त केले असले तरी त्यांना न जुमानता पदपथावर अतिक्रमण केले जाते. बाजार उठल्यानंतर या ठिकाणी कचर्याचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे. त्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेने ठोस कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai