राज्यमंत्री नवाब मलिकांना ईडीकडून अटक
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 23, 2022
- 656
मुंबई ः राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या कुर्ला स्थित घरी ईडीच्या टिमने आज पहाटे धाड टाकली. ही धाड 1993 सालच्या बॉम्बस्फोटातील आरोपी यांच्याकडून जमीन खरेदी प्रकरणाशी संबंधित आहे ही माहिती समोर आली. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना अटक केली आहे.
नवाब मलिक यांच्यावर ज्यावेळी आरोप करण्यात आले होते त्याचवेळी त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप पत्रकार परिषद घेऊन फेटाळून लावले होते. माञ ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार इकबाल कासकर याला अटक झाल्यानंतर नवाब मलिक यांचं एका प्रॉपर्टी खरेदी संदर्भात नाव समोर आल्याची माहिती मिळाली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तर दुसर्या बाजूला राजकीय वर्तुळातून या अटकेवर विविध प्रतिक्रिया उमटत आहे. मलिकांना झालेल्या या अटकेमुळे आता राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष आणखी पेटणार असल्याचं दिसत आहे. विरोधकांनी केंद्रीय तपास यंत्रणाचा सरकार चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचं म्हटल आहे. केंद्रिय तपास यंत्रणांच्या या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट ईडीच्या कार्यालात घुसण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना तत्काळ रोखल. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आव्हान केले.
- काय आहे प्रकरण?
- 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली खान आणि हसीना पारकर यांचा जवळचा व्यक्ती सलीम पटेल यांचे नवाब मलिकांशी व्यवसायिक संबंध.
- नवाब मलिक यांच्या नातेवाईकांच्या कंपनीला त्या दोघांनी करोडोची जमीन कवडीमोल भावाने विकली.
- कुर्ला येथील एलबीएस रोडला असलेल्या गोवा कंपाऊंड येथील करोडोची साडे तीन एकर जमीन 20 ते 30 लाखात मलिकांच्या नातेवाईकांना दिली.
- दाऊद नंतर हसीना पारकर प्रॉपर्टी खरेदी करत होत्या आणि त्यामधे पावर ऑफ अटरनी सलीम पटेल यांना लावत होत्या. तीच प्रॉपर्टी नवाब मलिक यांच्या नातेवाईकांनी खरेदी केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai