सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावलीसाठी हरकतींवर सुनावणी
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 31, 2022
- 668
नैना बिल्डर्स असोसिएशनने सादर केल्या होत्या सूचना व हरकती
नवी मुंबई : सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावलीतील तरतूदी लागू करण्याच्या दृष्टीने एमआयडीसीने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून 29 मार्चला सुनावणी जाहीर करण्यात आली होती. त्यात नैना बिल्डर्स असोसिएशन कडून हरकती व सूचना करण्यात आल्या. याअंतर्गत औद्योगिक वसाहतीच्या विकास प्रक्रियेत उपयुक्त ठरणार्या अनेक महत्वपुर्ण सूचना नैैना बिल्डर्स असोसिएशनने केल्या आहेत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने 3 फेब्रुवारी 2022 रोजी प्रारूप सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध केलेली होती. यावर नैना बिल्डर्स असोसिएशन कडून हरकती व सूचना करण्यात आल्या होत्या. सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली लागू करण्याकरीता 29 मार्च रोजी सुनावणी घेण्यात आली. याकरीता 31 पाने सूचना व आक्षेप देण्यात आले. तसेच एमआयडीसीने त्यांच्या बेवसाईटवर विविध उद्योजकांकडून जागांसाठी करण्यात आलेल्या मागणीचा तपशील टाकावा. एमआयडीसीकडे असलेल्या जागेचा विकास करताना 1:5 उतार असलेल्या जमिनी किती क्षेत्रांच्या आहेत हे निश्चित केल्यानंतरच बांधकामाकरीता बंदी असावी व एमआयडीसीच्या एकूण क्षेत्राच्या 40 टक्के पेक्षा कमी क्षेत्र असेल तर तेथे सपाटीकरणासाठी परवानगी देण्यात यावी. तसेच या क्षेत्रात आयटीपी नियमावलीप्रमाणे रस्ते, गार्डन, झाडे लावणे इ. कामांकरीता परवानगी असावी. नियोजन प्राधिकरण असलेल्या क्षेत्रापासून 10 कि.मी. परिघात औद्योगिक क्षेत्र करु इच्छिणार्यांना जमीनमालकांना भूखंडावर लेआऊटसाठी शासनस्तरावर नव्हे तर महामंडळ स्तरावर याची परवानगी देण्यात यावी. इ. विविध मागण्या तोंडी व लेखी स्वरुपात करण्यात आल्या. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बाविस्कर, वरिष्ठ विधी सल्लागार अॅड. प्राचाली पाटील, वास्तुविशारद व नगररचनाकार भाग्यश्री गपट- पाटील यांनी आपले म्हणणे सादर केले.
- महामंडळाने नवीन नियम स्वीकारण्याबाबत घेतलेली भूमिका ही अत्यंत प्रशंसनीय असल्याने औद्योगिक क्षेत्रातील भूखंडाचा विकास करण्यास मोठी चालना मिळेल व याकरीता मुख्य नियोजनकार प्रतिभा भदाणे यांनी केलेले हे काम उल्लेखनीय ठरेल असे मत प्रकाश बाविस्कर यांनी व्यक्त केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai