मिशन इंद्रधनुष मोहिमेची दूसरी फेरी
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 04, 2022
- 836
4 ते 11 एप्रिल या कालावधीत विशेष लसीकरण
नवी मुंबई ः केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात मार्च 2022 ते मे 2022 या कालावधीत विशेष मिशन इंद्रधनुष 4.0 च्या तीन मोहिमांचे नियोजन करण्यात आले आहे. यातील प्रथम फेरी 7 मार्च ते 13 मार्च 2022 मध्ये राबविण्यात आली. या मिशनची दुसरी फेरी 4 एप्रिल 2022 पासून राबविण्यात येत आहे.
बालकांमधील मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे अतिशय प्रभावी साधन आहे. मात्र अर्धवट लसीकरण झालेली तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात असे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे. या मोहिमेमध्ये लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.
या मोहीमेची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने लसीकरण टास्क फोर्सची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये इंडियन मेडीकल असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ पिडियाट्रीक, एकात्मिक बालविकास विभाग यांचे प्रतिनिधी, सर्व रुग्णालयांचे प्रमुख तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. या सभेमध्ये अपेक्षित लाभार्थ्यांच्या यादीपैकी प्रत्येक लाभार्थ्यावर लक्ष केंद्रीत करुन 100% उद्दिष्टपूर्ती करणेकरीता प्रत्येक वैद्यकीय अधिकारी यांनी विशेष प्रयत्न करावेत असे सूचित करण्यात आले. यापूर्वीच या मोहीमेची पहिली फेरी 7 मार्च ते 13 मार्च 2022 या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यात आली. यामध्ये 65 सत्रांव्दारे 378 गरोदर माता व 1569 बालकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या मोहिमेमध्ये एकूण 387 गरोदर मातांना व 1529 बालकांना लसीकरण करण्यात आले. या मोहिमेला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. शासन निर्देशानुसार या मोहिमेची पुढची दूसरी फेरी 4 एप्रिल ते 11 एप्रिल 2022 या कालावधीत राबविण्यात येत असून यासाठी 64 बाहयसत्रे व 5 मोबाईल अशा एकूण 69 सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये 371 गरोदर माता व 1325 बालकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे व लसीकरणाबाबत संबंधीत सर्व कर्मचार्यांचे पुन्हा प्रशिक्षण घेण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai