बांधकाम व्यवसाय संकटात
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 22, 2022
- 846
निर्मिती खर्च वाढीने प्रकल्प पूर्ण करण्यास विलंब
नवी मुंबई ः बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाईने ‘इम्पॅक्ट असेसमेंट सर्व्हे’ अहवाल प्रकाशित केला असून यामध्ये देशातील 1,850 विकासकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. बांधकाम निर्मितीच्या कच्च्या मालाच्या किंमतींमध्ये होत असलेल्या वाढीमुळे विकासकांसमोरील संकट अधिक गहिरे होत चालले आहे. 40% विकासकांनी अशा परिस्थितीत तग धरून राहण्याविषयी साशंकता व्यक्त केली तर 76 % विकसकांनी फक्त सहा महिने काम सुरु ठेवण्याची आपल्या क्षमता व्यक्त केली आहे. बांधकाम खर्चामध्येही 20टक्या्रं ची मोठी वाढ होणार असल्याने बांधकाम व्यवसाय संकटात सापडणार असल्याचे भाकित या अहवालात करण्यात आले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून वाढत्या किंमतींची समस्या बांधकाम व्यवसायाला भेडसावत आहे. मात्र सद्यपरिस्थितीत काही प्रकारच्या कच्च्या मालांच्या किंमती जवळ-जवळ 115 टक्यांनी वाढल्या आहेत. सिमेंट प्रति नग 100 रुपयांनी महाग झाले असून स्टीलचे दर 39,000 रुपयांवरुन 81,000 रुपयांवर पोहोचले आहेत. कच्च्या मालाच्या किंमतींमध्ये 40 टक्केक वाढ होऊनही हे उद्योगक्षेत्र नकारात्मक परिणामांशी जुळवून घेत आले आहे. गगनाला भिडलेल्या या किंमतींमुळे या परिस्थितीला सामोरे जाणे विकासकांना अशक्य झाल्याची भावना या कार्यक्रमात व्यक्त केली आहे. कच्च्या मालाच्या किंमतीत सुधारणा झाली नाही आणि चालू परिस्थितीपासून तत्काळ दिलासा मिळाला नाही तर आपल्याला सहा महिन्यांहून अधिक काळ काम सुरू ठेवता येणार नाही असे 76 टक्केर विकासकांना वाटत आहे. हे उद्योगक्षेत्र रोजगारनिर्मिती करणारे देशातील दुस-या क्रमांकाचे सर्वात मोठे क्षेत्र आहे, त्यामुळे इथल्या कामामध्ये शिथिलता आली किंवा ते ठप्प झाले तर त्याचा थेट परिणाम या क्षेत्रामध्ये तसेच त्याच्याशी संबंधित 250 हून अधिक उद्योगांमध्ये कार्यरत श्रमजीवी वर्गावर आणि त्यांच्या उदरनिर्वाहावर होणार आहे.
पॅनडेमिकनंतर या उद्योगक्षेत्राच्या वाढीला गती देण्यासाठी विकासक गेल्या वर्षभरापासून बांधकाम खर्चात झालेली वाढ सोसत आहेत, मात्र खर्च आणि विक्रीमूल्यात अत्यंत कमी तफावत उरल्याने हळूहळू या खर्चाचा भार अपरिहार्यपणे ग्राहकांवर पडणार आहे, जे या उद्योगक्षेत्राच्या विकासाची गती राखण्याच्या दृष्टीने चांगले नाही. रिअल इस्टेट उद्योगक्षेत्रासाठीची शिखर संस्था या नात्याने आम्ही संबंधित मंत्रालयांशी सतत संवाद साधत आहोत व घर खरेदी करणा-यांना त्यांचे घर ताब्यात मिळण्यास विलंब होऊ नये, ठप्प झालेले प्रकल्प पुन्हा जोमाने सुरू व्हावेत आणि या उद्योगक्षेत्राशी संबंधित 251 पूरक व्यवसायांमध्ये कार्यरत कामगारांच्या नोक-या जाऊ नयेत यासाठी सरकारने आवश्यक तो हस्तक्षेप करावा अशी मागणी करत आहोत.
- या उपाययोजना केल्यास दिलासा
कच्चा मालासाठी निश्चित किंमती निर्धारित करणे, या कच्चा मालासाठी जीएसटीइनपुट क्रेडिट पुरवणे, बांधकामासाठी लागणा-या कच्च्या व स्टॅम्प ड्युटीमधील सवलत किंवा कर्जमाफीच्या माध्यमातून ग्राहकांना लाभांश वा अनुदान देणे आणि व्याजदर कमी करणे यासारख्या उपाययोजनांचा समावेश के्रडाईने सरकारकडे केला आहे. या उपाययोजनांमुळे उद्योगक्षेत्राला गती मिळण्याची अपेक्षा बांधकाम व्यावसायिकांना आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai